बंडोबांना आणखी एक दणका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. बंडखोरी केलेल्या नेत्यांजवळची सर्व खाती उद्धव ठाकरेंनी काढून घेतली आहे. यामुळे बंडखोरांना चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आलं आहे.
जाणून घ्या आता कुणाकडे कोणतं खातं…
गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे सोपवण्यात आलंय. दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आलं आहे.
राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल..
शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील गृह ग्रामीण हे खातं संजय बाबुराव बनसोडे यांना देण्यात आलं आहे. विश्वजित पतंगराव कदम यांच्याकडील वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता हे खातं सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांना देण्यात आलं आहे.
राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांच्याकडील महसूल खाते प्राजक्त तनपुरे, ग्राम विकास खाते सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे, तर बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य खाती आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहेत. राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आलं आहे.
प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडील शालेय शिक्षण विभाग आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार विभाग सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. महिला व बाल विकास संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘साहेब तुम्ही विजयी व्हावेत!,’ मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचा एकनाथ शिदेंना जाहीर पाठिंबा
लग्नानंतर दोन महीन्यातच आलिया भट आणि रणबीर कपूर बनणार आईवडील, गुड न्युज शेअर करत म्हणाले…..
शिवसैनिक आणि बंडखोर आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची