शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत. (governer write letter to mumbai police for mla)
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. बंडखोर आमदांचे पोस्टर फाडण्यात आले आहे. तसेच त्यांचे ऑफिसही फोडण्यात आले आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या घरावरही हल्ले होण्याची शक्यता आहे.
बंडखोर आमदार कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी करताना दिसून येत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई पोलिसांना आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांसाठी आता राज्यपाल स्वत: मैदानात उतरले आहे, असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांच्या संरक्षणासाठी केंद्राने सुद्धा पुढाकार घेतला आहे. त्यांनी आमदारांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी कुटुंबाला संरक्षणाची गरज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आमदारांच्या कुटुंबियांसाठी केंद्राने सुरक्षा दिली होती. अशात राज्यपालांनी मुंबई पोलिसांनाही आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहे.
शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या १५ बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्षा मिळालेली आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडीत मोठा ट्विस्ट आला आहे. शिवसैनिक सध्या खुपच आक्रमक झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही हल्ले होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
“बंडखोर आमदार म्हणताहेत काय करू कळत नाही, फाशी घ्यावीशी वाटतेय”
…तर बंडखोरी केलेले ५० टक्के आमदार शिवसेनेत परत येतील; खासदाराने दिली ‘ही’ भन्नाट आयडीया
तुम्ही वरळीला फिल्डींग लावा नाहीतर दादरला लावा! बंडखोरांना सभागृहात आणायला भाजपचा भन्नाट प्लॅन