गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांमध्ये तानाजी सावंत यांचंही नाव आहे. त्यांच्याविरोधातही शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
यांच्याविरोधात शिवसेनेने खळखट्याक मोहीम सुरू केली आहे. शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या पुणे आणि उस्मानाबाद येथील कार्यालयांवर हल्ला झाला आहे. त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
हे सगळं झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला आहे. त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, आमचे गटेनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत.
एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं, असं ते आपल्या पोस्टमध्ये ण्हणाले आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर शिवसैनिक आणखी संतापले आहेत. तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना इशारा दिल्यानंतर त्यांच्या मुलानेही यावर प्रतिक्रिया दिली.
तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत म्हणाले की, अशा छाटछूट हल्ल्याला आम्ही घाबरत नाही, करारा जवाब मिलेगा. त्यांनी आपल्या फेसबूक स्टेटसवर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीवर त्यांना इशाला दिला. फेसबूकवर ठेवलेल्या स्टेटसमध्ये ते म्हणाले की, आमचे नेते. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर जो भ्याड हल्ला झाला त्याला योग्य वेळी उत्तर दिले जाईल.
अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. करारा जवाब मिलेगा, असा इशारा त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडले. कार्यालय फोडल्यानंतर शिवसैनिकांनी सावंत गद्दार आहेत, अशा घोषणा दिल्या. माध्यमांशी बोलताना शिवसैनिक म्हणाले की, तानाजी सावंत कळीचे नारद आहेत ते खरे शिवसैनिक नाहीत.

महत्वाच्या बातम्या
शिवसेना अडचणीत येताच मनसे धावली मदतीला; कोकणातील मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश
बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही, शिवसेना निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवणार; शिंदे गटाला मोठा धक्का
‘गद्दारांना ठोका! ठाकरे ब्रँड वाचवा!’ अडचणीतील शिवसेनेच्या मदतीसाठी मनसेही उतरली मैदानात
दादा भुसेंनी शिवसेनेत राहून ४० वर्षात जे कमावलं ते बंडात सामील होऊन मातीत घातलं