गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे सध्या हे आसाममध्ये तळ ठोकून आहेत. (mns posters on uddhav thackeray)
एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अशात मुंबईत सुरु असलेल्या बॅनरबाजींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काहींनी उद्धव ठाकरेंना सपोर्ट केला आहे, तर काहींनी एकनाथ शिंदेंना सपोर्ट केला आहे. त्याचे बॅनरही चर्चेत आहे. असे असतानाच आता मनसेही शिवसेनेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
मनसेचे चांदीवाली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानूशाली यांनी मुंबईत काही बॅनर लावले आहे. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिचवण्याचा प्रयत्न आहे. राज ठाकरे आणि मागे अयोध्येतील राम मंदिराचे फोटो असलेले बॅनर भानूशाली यांनी लावले आहे.
या बॅनर्सवर त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय? असा सवाल भानूशाली यांनी बॅनर्सच्या माध्यमातून विचारला आहे. शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते, पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३६ आमदार फोडले होते, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
प्रसार माध्यमांशीही भानूशाली यांनी संवाद साधल आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की, त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की, सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे. एकनाथ शिंदे ३६ आमदार घेऊन गेलेत. म्हणजे सहा गुणीले सहा म्हणजेच सहा पट देवाची लाठी तुम्हाला लागलेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आम्ही खरे हिंदुत्व ते खोटे हिंदुत्ववादी नाही. पुर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपाने कट्टर हिंदुत्वावादी नेता पाहिला आहे. मात्र आज कशी परिस्थिती झालीये की तुमचेच आमदार सांगताय तुम्ही हिंदुत्व सोडल्याने आम्हाला तिकडे जावं लागलं आहे, असेही भानूशाली यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रत्येक वेळेस आव्हान देऊन चालत नाही; आमदार भास्कर जाधव संजय राऊतांवर भडकले
धोका देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची संपत्ती वाचून अवाक व्हाल; ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या…