सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपकडून सत्तास्थापनेचे काही संकेत मिळत आहेत.
भाजपाने आपल्या आमदारांना कुठल्याही दौऱ्यावर जाऊ नये, संपर्कात रहावे, कोणत्याही क्षणी मुंबईला यावे लागेल, असे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर सागर बंगल्यावर बैठका झाल्या. येथूनच भाजपाने आमदारांना तातडीचे आदेश पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे.
यावरूनच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे. भाजपला लक्ष करत मिटकरी यांनी म्हंटलं आहे की, ‘जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडीच्या आखाड्यात आहेत, तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही.’ याबद्दल मिटकरी माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना मिटकरी म्हणाले, ‘राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे सध्या महाविकास आघाडी सरकारवर संकट आहे. शिवसेनेच्या बंडखोरांना भाजप रसद पुरवत असल्याच वृत्त समोर येत आहेत. मात्र असं असलं तरीदेखील मविआघाडीचे सरकार वाचवण्यासाठी जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत, तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही.’
दरम्यान, महाविकास आघाडीत सध्या खळबळ माजलेली आहे. सरकार वाचवण्यासाठी सध्या आतोनात प्रयत्न केले जात आहे. एकनाथ शिंदेसोबत ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना काही अटी घातल्या होत्या.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लाईव्ह येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि बंडखोर आमदारांना काही अटीही घातल्या. यावेळी उद्धव ठाकरे भावनिक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी मुख्यमंत्री पदावरून पायऊतार होण्याचीही भूमिका दर्शवली. तब्बल ५ ते १० मिनीटांच्या या लाईव्हमध्ये त्यांनी शिवसैनिकांना भावनिक करून सोडलं.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंसोबतचा तो वाद पक्षाला भोवला, दोन दिवसांपूर्वीच पडली वादाची ठिणगी
अमित शहांचा एकनाथ शिंदेंना मेसेज; उद्धव ठाकरेंनां सांगा तुम्ही चुकीच्या लोकांनी पंगा घेताय
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना दणका, भरत गोगावलेंची पक्ष प्रतोदपदी केली निवड
SID ने दोन महिन्यांपुर्वीच सरकारला दिली होती एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची पुर्वकल्पना, पण