शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते सध्या गुजरातच्या सुरतमध्ये आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (kailas patil leave eknath shinde)
एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारलाही धोका निर्माण झाला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून आमदार कैलास पाटील हे रहस्यमयरित्या सुटले आहे. तसेच त्यानंतर ते थेट मातोश्रीवर गेले आणि तिथे त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.
कैलास पाटील हे उस्मानाबादचे आमदार आहे. त्यांना स्नेहभोजनासाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी ते सहकारी आमदारांप्रमाणे बोलवण्यात आलेल्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून नेण्यात आले. त्यावेळी त्यांचा फोन काढून घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झाला.
कैलास पाटील यांच्यासह इतर आमदारांना गाडीत बसवून गुजरातला घेऊन जात होते. हे त्यांच्या लक्षात आले, पण कोणाला सांगताही येईना आणि कोणाकडे मदतही मागता येईना. त्यामुळे त्यांना त्या गाडीत तसेच शांतपणे बसून राहावे लागले आणि गुजरातला जावे लागले.
गुजरात सीमेवर पोलिसांचा ताफा होता. त्यावेळी गाडी चहा पाण्यासाठी थांबली होती. अशात लघुशंकेचे कारण सांगत त्यांनी तिथून त्यांनी पळ काढला आणि ते सुरु असलेल्या पावसात रस्त्यावरुन धावत सुटले. त्यानंतर त्यांनी एका ट्रकला हात दिला आणि त्या ट्रकमध्ये बसून मुंबईच्या दिशेने येऊ लागले.
त्यानंतर ट्रक दुसऱ्या बाजूने जाणार असल्यामुळे त्यांना ट्रकमधून उतरावे लागले. त्यानंतर इतर वाहनांना लिफ्ट मागत अखेर ते मुंबईत आले. त्यानंतर ते थेट मातोश्रीवर आले. तिथे पोहचताच ते ढसाढसा रडू लागले. तसेच हा सर्व प्रकार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितला.
महत्वाच्या बातम्या-
“शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदासाठी तुम्ही नालायक आहात असं शिवसैनिकांनी सांगीतलं तर तेही पद सोडतो”
…तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना घातली ‘ही’ अट
पक्षाच्या बैठकीला हजर राहा नाही तर पक्ष सोडा; शिवसेनेने आमदारांना धाडली नोटीस