एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. ते सध्या गुजरातमध्ये आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
अखेर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचा गर्व से कहो हम हिंदू है हा नारा सार्थ केला जाईल. फिर मिलेंगे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशात मंगळवारी रात्री २.१५ वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर आमदार सुरतमधील हॉटेलमधून विमानतळावर पोहचले होते. तीन बसेस विमानतळावर पोहचल्यानंतर तिथे पत्राकारही होते, त्यावेळी त्यांनी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना आमदारांनी बंड केलेले नाही. शिवसेना आमदारांनी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेब आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून शिवसेनेचे आमदार कधीही फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचा गर्व से कहो हम हिंदू है हा नारा सार्थ केला जाईल. फिर मिलेंगे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर शिवसेना आणि भाजप यांच्यात युती व्हायला हवी, असे प्रताप सरनाईकांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिंदेंच्या बंडा मागे ना फडणवीसांचा हात, ना मुख्यमंत्र्यांवरची नाराजी; बंडामागचे खरे कारण अजित पवार
एकनाथ शिंदेंनी रात्री सव्वा दोन वाजता साधला पत्रकारांशी संवाद; म्हणाले, शिवसेना आमदारांनी…
शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली; शिंदे समर्थक आमदारांना हॉटेलमधून उचलून थेट नेलं ‘वर्षा’ वर