शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल झाले होते. शिंदे सध्या गुजरातच्या सुरतमध्ये असून त्यांच्यासोबत ३० आमदारही आहे. हा शिवसेनेसह महाविकास आघाडीलाही मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. (shivsena plan for eknath shinde)
सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. आता ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे.
मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांची मनधरणी करु शकतील का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा डाव उलटवून लावण्याची चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला एक प्रस्ताव दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याबाबत चर्चा सुरु होती. तसेच शिवसेना नेत्यांची वर्षा बंगल्यावर एक बैठकही पार पडली होती. त्याबाबत बोलनाता शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेचा प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार नाही. शिवसेनेत प्रस्ताव स्वीकारण्याची पद्धत नाही, असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सात आमदार पुन्हा मुंबईत परतणार असल्याची चर्चा आहे. सध्या सात आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते पुन्हा शिवसेनेत परत येतील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा डाव उलटण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांना संपर्क साधला होता, तसेच चर्चेसाठी सुरतला भेटायला बोलावले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर त्यांचे मन वळवू शकतील का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बंडखोर एकनाथ शिंदेंना दिघे कुटुंबीयांनी सुनावले; आनंद दिघेंनी गद्दारी सहन केलीच नसती..
आमदारांना जबरदस्तीने सुरतला पळवून नेलय; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्नीची पोलिसांत तक्रार
बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी प्रतारणा नाही केली- एकनाथ शिंदे