शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सोमवारपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत होते. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता पण त्यांच्याशी संपर्क साधला जात नव्हता. (eknath shinde 3 conditions to uddhav thackeray)
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत १३ आमदार असल्याचीही चर्चा आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांचे हे बंड महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असू शकतो असे म्हटले जात आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला आहे. त्यात त्यांनी काही अटी ठेवल्या आहे. प्रस्तावात त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर, आणि दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी या प्रस्तावात केल्याचे म्हटले जात आहे.
तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपली वर्णी लावावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या प्रस्तावामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
तसेच सुरतच्या हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांना हलवण्यात येणार आहे. त्यांना अहमदाबादमध्ये पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले आहे.
महत्वाच्या बातम्या-
चुकीला माफी नाही! एकनाथ शिंदेंना पहिला ‘ठाकरी’ झटका ! शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट; म्हणाले, चर्चा करणार पण त्यासाठी…
कोण आहेत सी. आर. पाटील ज्यांनी एकनाथ शिंदेंना रातोरात सुरतला हलवलं? वाचा त्यांच्याबद्दल..