राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या मला माहितीये; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. मात्र शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसून येत आहे. या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहे.

राजसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं यावर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.  ‘राज्यसभेत एकही मत फुटले नाही. कोणी कलाकारी केल्या ते माहित आहे,’ असं उद्धव ठाकरे बोलले. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन साजरा होत आहे.

हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. ‘राज्यसभेत एकही मत फुटले नाही. कोणी कलाकारी केल्या ते माहित आहे. उद्याच्या निवडणुकीत फाटाफुटीची शक्यता नाही. शिवसेनेत गद्दार कोणी राहिला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘फाटाफुटीचं राजकारण आपण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको.’

दरम्यान, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे यालाच लोकशाही म्हणतात. उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या नंतर हे अजून मोठं चित्र दिसलं पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-
KGF बद्दल करण जोहरचं मोठं वक्तव्य, म्हणाला, आम्ही असा चित्रपट बनवला असता पण…
मिर्झापुर ३ चे शूटिंग सुरू होण्याच्या आधीच कालीन भैयाने सांगून टाकली संपूर्ण कहाणी, अनेक प्रश्नांची मिळाली उत्तरे
महाबळेश्वर फिरण्यासाठी येणाऱ्यांकडे इलेक्ट्रिक वाहने आवश्यक; महापालिकेने घेतला मोठा निर्णय