Share

चार वर्षात तरुण निवृत्त होऊ घरी आला तर त्याला मुलगी कोण देणार? अग्निपथ योजनेवरुन कन्हैय्या कुमार भडकले

मोदी सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेवरुन देशभरात वाद सुरु आहे. त्यामुळे मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. अशात काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी अग्निपथ योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहे. (kanhaiyya kumar criticize modi government)

कन्हैय्या कुमार यांनी म्हटले की, सरकारचे प्रत्येक मंत्री ज्या पद्धतीने अग्निपथ योजनेचे फायदे सांगत आहेत, त्यावरून ते काहीतरी विकत असल्याचे दिसते. या भाषेची मानसिकता ओळखण्याचा प्रयत्न करा. या योजनेची गरज काय आहे हे आधी मंत्र्यांना सांगावे लागेल?’ अग्निपथ योजना ही देशातील तरुणांना पेटवण्याची योजना आहे.

‘अग्निपथ’वर बिहारमध्ये सुरू असलेल्या गदारोळावर कन्हैया कुमार म्हणाले की, बिहारचा बेरोजगारीचा दर राष्ट्रीय बेरोजगारीच्या दरापेक्षा दुप्पट आहे. तिथे कामासाठी इतर राज्यात स्थलांतरित होण्याचा प्रकार अनेक दशकांपासून सुरू आहे. यासाठी विद्यमान सरकारचा दोष नाही. पण तो प्रश्न सोडवला पाहिजे.

तसेच तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळेल की नाही याची भीती आहे. ते सैन्यात भरती झाले नाही तर त्यांचं लग्नच होणार नाही. तसेच चार वर्षांत तो निवृत्त झाला तर त्याच्याशी कोण लग्न करणार? त्यांना मुलगी कोण देणार? असा सवालही कन्हैय्या कुमार यांनी उपस्थित केला आहे.

कन्हैया कुमार म्हणाले की, ‘मी बिहारचा आहे, मी अशा कुटुंबातून आलो आहे जिथे १५-१६ लोक सशस्त्र दलात आहेत. सध्या देशात सैन्य भरतीची प्रक्रिया नियमित सुरू असताना ती प्रक्रिया बंद करण्याचे कारण काय? तरुणांना रोजगार मिळण्यासाठी हे सर्व केलं जात आहे, हे सर्व केंद्र सरकारचे खोटे दावे आहे.

तसेच पीएमओने नुकतेच ट्विट करून दीड लाख नोकऱ्या दिल्या जातील, असे म्हटले. नोटाबंदी झाली तेव्हा दहशतवाद संपेल, नक्षलवाद संपेल, असे म्हटले होते. असे असतानाही नक्षलवादी, दहशतवादी हल्ला करत आहे. नोटाबंदीनंतर दहशतवाद संपला असता तर पुलवामा घटना कशी घडली? असा सवालही कन्हैय्या कुमार यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मेहबूब शेख प्रकरणात चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला ओढलं; म्हणाल्या, त्याने…
अग्निपथ योजनेमुळे देशभरात हिंसाचार करणाऱ्यांमागे ‘या’ लोकांचा हात, धक्कादायक माहिती आली समोर
संजय राऊतांनी संशय घेतलेले ‘ते’ तीनही आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर; राजकारणात खळबळ

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now