Share

निकाल काहीही आला तरी निराश होऊ नका, दहावी नापास झालेले ‘हे’ दिग्गजही आहेत आयुष्यात टॉपर

सेलिब्रिटी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे किंवा त्यांचा भूतकाळ कसा होता, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या १० वीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे आपण कोणत्या स्टार्सचे किती शिक्षण झाले आहे हे जाणून घेणार आहोत. (this bollywood superstar also fail in exam)

आमिर खान- आमिर २५ वर्षांहून अधिक काळापासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, आमिर कोणत्या शाळेत, कधी आणि कुठे शिकत असल्याची कोणतीही माहिती नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की त्याचा आणि शाळेचा कधीच संबंध आला नव्हता. सध्या आमिर त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सलमान खान- सलमान खानबद्दल सांगायचे तर, त्याने सिंधिया स्कूल ग्वाल्हेर आणि सेंट स्टेनस्लॉ स्कूलमध्ये शालेय शिक्षण केले. त्यानंतर मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु त्यानंतर तो कधीही कॉलेजला गेला नाही. सलमानने हायस्कूलपर्यंत शिक्षण घेतले आहे.

अक्षय कुमार- जो सध्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याबद्दल सांगायचे तर, त्याने मुंबईच्या खालसा कॉलेजमध्ये ११ वीला प्रवेश घेतला पण त्याने कधीच अभ्यास केला नाही आणि त्याने कॉलेजही केले नाही. एका मुलाखतीत अक्षयने स्वतः सांगितले आहे की, त्याने शालेय शिक्षणाला कधीच प्राधान्य दिले नाही.

कतरिना कैफ- कतरिना कैफबद्दल सांगायचे तर, परिस्थिती अशी होती की ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही. कतरिना ७ भावंडांपैकी एक आहे. दुसरे म्हणजे, कतरिना लहान असताना तिचे पालक वेगळे झाले. कतरिनाने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. अशा स्थितीत शाळा, कॉलेज, सर्व काही मागे पडले.

करीष्मा कपूर- ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूरने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की करिश्माने केवळ सहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. जे तिच्या चाहत्यांसाठी खुप हैराण करणारी गोष्ट आहे.

काजोल- वयाच्या १६ व्या वर्षी ‘बेखुदी’ चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री काजोल देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. जिने तिचे शालेय शिक्षणही पूर्ण केले नाही. नंतर तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहे.

कंगना राणावत- कंगना आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी तिने बराच काळ संघर्ष केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की कंगना १२ वीमध्ये नापास झाली होती आणि तेव्हापासून तिने पुढील शिक्षण घेण्याचा विचार सोडून दिला आहे. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातच काम करण्यास सुरुवात केली.

अर्जून कपूर- प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूरही १२ वी नापास झाला आहे. पण, बॉलीवूडमध्‍ये तो एक सक्सेसफुल अभिनेता आहे. सध्या अर्जुन मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. लवकरच ते लग्न करणार आहे अशीही चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्याकडून साईचरणी ५ हजार किलो केशर आंब्याचे दान, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
हॉटेलचे पैसे न दिल्यामुळे सदाभाऊ खोतांवर भडकले अमोल मिटकरी; म्हणाले, पोट फुटेपर्यंत…
“सदाभाऊ खोत फसवा माणूस, माझ्यावर गुन्हा दाखल करायचाय तर करा पण माझे थकलेले बिल द्या”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now