Share

‘राष्ट्रपती पदासाठी उंची आणि बौद्धिक पातळी आवश्यक आहे’, सदावर्तेंचा शरद पवारांना टोला

sharad pawar

नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.

पुढील महिन्यात 18 जुलै मतदान पार पडणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपतिपदाच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र असे असले तरी देखील, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी नकार दर्शवला आहे.

याचाच धागा पकडत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. “राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे? कारण, राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट उंची लागते,” असे सदावर्ते म्हणाले.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले, ‘मला वाटते की, वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. मात्र राष्ट्रपतीपदासाठी उंची लागते. तसेच बौद्धिक पातळी आवश्यक आहे. शरद पवार यांना चर्चेतून वाजवले जात आहे, असा हल्लाबोल सदावर्ते यांनी पवार यांच्यावर केला आहे.

याचाच धागा पकडत महाराष्ट्राचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सदावर्ते यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत चव्हाण यांनी थेट निशाणा साधला आहे. ‘पवार साहेबाची उंची समजला बौद्धिक क्षमता,चांगली दृष्टी व लायकी लागते सदावर्तें सारख्या बाजारूला काय समजणार पवार साहेब,’ असं चव्हाण यांनी म्हंटलं आहे.

तर दुसरीकडे भाजपचे खासदार दिलीप घोष यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘शरद पवारांसारखे राष्ट्रपती आपल्या देशाला मिळाल्यास दहशतवाद वाढेल,’ असे खळबळजनक विधान घोष यांनी नुकतच केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
गौतम अदानी आणि प्रिती अदानींना पवारांच्या घरी पाहून सगळेच झाले हैराण; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा
टॉमेटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे हे षडयंत्र, सदाभाऊंचा इशारा कोणाकडे?
मोठी बातमी! वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, भडकलेले वसंत मोरे म्हणाले; त्याचा बाप…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now