बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यावर हार्दिक पांड्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे, तर सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झाले आहे. (punekar rahul tripathi react on indian team selection)
टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. हे दोन सामने २६ आणि २८ जून रोजी होणार आहेत. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर युवा संघाला आघाडीवर आणण्यात आले आहे.
आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंमध्ये राहूल त्रिपाठीचेही नाव सामील आहे. राहूल हा पुण्याचा आहे. आयपीएलच्या १५ व्या सिजनमध्ये राहूल त्रिपाठीने दमदार कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावरच त्याला ही संधी मिळाली आहे. आपली निवड झाल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
राहूल त्रिपाठी आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा अनकॅप्ट बॅट्समन आहे. त्याने आतापर्यंत १७९८ धावा केल्या आहे.यामध्ये दुसऱ्या स्थानावर मनन व्होरा आहे, ज्याने १०७३ धावा केल्या आहे. १५ व्या सिजनमध्ये राहूलने सनसायझर्स हैदराबादकडून खेळताना १४ सामन्यांमध्ये ४१३ धावा केल्या होत्या.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर राहूलने आता प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी ही एक खुप मोठी संधी आहे. निवड समितीने माझ्यावर विश्वास दाखवला त्याचा मला आनंद आहे. हे माझ्या कष्टाचे फळ आहे. मी दिलेल्या संधीचा चांगला उपयोग करेल आणि माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न माझा असेल, असे राहूलने म्हटले आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेट किपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
महत्वाच्या बातम्या-
अंबानी-अदानींचा फोटो पोस्ट करुन मिटकरींचा फडणवीसांना टोला; म्हणाले, अहो दाजी हेच का ते…
प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, माझ्या मुलीने डेटींग ऍपवर माझं अकाऊंट उघडलं अन्…
एका चुटकीत ३०० कोटी कमवू शकतो, तेव्हा त्यांना वाटायचे बाता मारतोय, पण आता ते खरं झालय






