Share

नाद खुळा! सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या जॉब लाथ मारत पाळली गाढवं; आता कमवतोय लाखो रुपये

gounda

अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. यातून ते लाखोंने उत्पादन घेत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करावी. आणि आरामात पैसे मिळवावे.

मात्र एका माणसाने चक्क चांगल्या नोकरीला लाथ मारून गाढव पाळले आहे. त्यातून तो लाखोंने उत्पादन घेत आहे. त्याने गाढवं पालणाचे अनोखे काम करून आपले नाव कमवले आहे. चला तर जाणून घेऊया नेमका हा प्रयोग काय? त्यांना कसा झाला एवढा फायदा?

श्रीनिवास गौडा असे या माणसाचे नाव आहे. गौडा हे यापूर्वी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करायचे. मात्र त्यांच नोकरीत लक्ष लागले नाही. आणि नंतर त्यांनी 2020 मध्ये त्यांनी नोकरीला लाथ मारली. त्यानंतर केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात गाढवे पाळण्यासाठी फार्म उघडण्यात आले.

त्यांनी इरा गावात सुमारे 2.3 एकर जागेत गाढव पाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 20 गाढवे आणली. त्यानंतर त्यांनी गाढवांचे उत्तम पालनपोषण केले. श्रीनिवास गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवाचे दूध चवदार, महाग आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते.

विशेष बाब म्हणजे गाई, म्हैस, शेळी पेक्षा गाढवाचे दूध महाग विकले जाते. वाचून तुम्हाला धक्का बसेल, मात्र गाढवाचे 30 मिली दूध 150 रुपयांना विकले जाते. तर आता गौडा हे दुधाची पॅकेट्स बनवतील. त्यानंतर ते दूध सुपरमार्केटला पुरवतील. याचबरोबर ब्युटी प्रोडक्टमध्येही या दुधाचा वापर होतो.

याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, गौडा यांच्याकडे17 लाख रुपयांच्या ऑर्डर आधीच आल्या आहेत. सध्या त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा सुरू आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. अनेक नागरिक त्यांच्यावर या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर आर्थिक ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now