गेल्या काही वर्षात बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहे. महिलांवर झालेल्या अनेक बलात्कारांच्या घटना समोर येत असतात. तसेच पुरुषांवरही बलात्कार झाल्याचे घटना घडत असतात, पण त्या समोर येत नाही. आता अशीच एक घटना युक्रेनमधून समोर आली आहे. (wife rape man 10 years)
एका पतीने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केला आहे. एका वक्तीने आपली पत्नी आपल्यावर १० वर्षांपासून बलात्कार करत असल्याचे सांगितले आहे. त्याच्या या आरोपाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कित्येक वर्षांपासून तो हे सर्व सहन करत होता.
संबंधित व्यक्तीच्या पत्नीचे नाव इरा असे होते. ती आता त्याची माजी पत्नी आहे. त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती, त्यावेळी त्याने पत्नीने त्याच्यासोबत केलेल्या भयानक कृत्यांबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, तिला खुप वेदनादायी आक्रमक संभोग करण्याची इच्छा असायची, त्यामुळे अनेकदा ती मला मारहाणही करायची.
तो म्हणाला, माझा पहिला संभोग इराशीच होता. पण तेही नॉर्मल नव्हतं. आमचा पहिला संभोग जवळपास पाच तास चालला होता. त्यावेळी तिला तो खुपच वेदनादायी आणि आक्रमक असा हवा होता. त्यामुळे माझ्या शरीरावर मोठ्या जखमाही पडल्या होत्या.
मला तिच्यासोबत कधीच आनंद मिळाला नाही. मला संभोगांबद्दल जास्त माहिती नव्हती. त्यामुळे ती काहीही म्हणाली तरी मी होकार द्यायचो. पण तिच्या वेदनादायी संभोगांमुळे मी लवकरच तिला नकार देण्यास सुरुवात केली. पण तिला काहीच फरक पडला नाही आणि माझ्या पत्नीने माझावर बलात्कार करण्यास सुरुवात केली, असे तरुणाने म्हटले आहे.
तसेच मी जेव्हा ऑफिसमधून यायचो, तेव्हा ती सेक्सची मागणी घेऊन माझ्या मागे लागायची. मला हे हवंय, माझी अशी इच्छा आहे. पण जेव्हा मी तिला मी नाही म्हणायचो. तेव्हा ती मला मारझोड करायची आणि माझ्या कातडीवर रक्त येईपर्यंत ती मला ओरबडायची. त्यामुळे मला एकच पर्याय होता तो म्हणजे मी १२-१४ तास घराबाहेर राहून काम करणं, असे त्या तरुणाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो! वाहतुक पोलिसांना आता थेट दंड आकारता येणार नाही, ‘या’ पद्धतीने होणार कारवाई
कोणी ओळखू नये म्हणून संतोष जाधवनं केलं होतं टक्कल, तरीही पोलिसांनी ‘असा’ केला जेरबंद
तुम्ही सिनेमागृहात आलात का? ड्रेसवरून भर कोर्टात न्यायाधीश वरिष्ठ अधिकाऱ्यावर नाराज; व्हिडिओ झाला व्हायरल