Share

उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पड मारलीय – किरीट सोमय्या

Kirit-sommya-Uddhav-Thakare.j

अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती की राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येणार का? पण न्यायालयाने यावर महाविकास आघाडी सरकारला दणका देत निकाल दिला. न्यायालयाने त्यांना मतदान करता येणार नाही असा निकाल दिला आणि विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली.

राज्यसभेत १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. विशेष न्यायालयाने गुरूवारी जामीन देण्यास नकार दिला. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हे तर होणारच होतं. उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने १२ वी थप्पड मारली आहे. माफिया सरकारच्या माफिया सरदारला असं  वाटतंय की, गुंडासारखं राज्य करायचं. परंतु हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत मान्य नाही.

उद्धव ठाकरेंनी दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवलं आणि जनतेला सांगितलं मी ठेवणार. आता पाहा काय होतंय, आता कळेल त्यांना आणि अशी माफियागिरी करणाऱ्या सरकारला न्यायालयाने अशाच प्रकारे अनेक धडे शिकवले आहेत. पुढेही शिकवत राहणार आणि शेवटचा धडा महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता शिकवणार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

कोर्टाच्या या निर्णयानंतर नवाब मलिक आणि अनिल देशमुख उच्च न्यायालयात जाणार आहेत. किरीट सोमय्या याबाबत म्हणाले की, त्यांना जिथं जायचंय जाऊद्या. ठाकरेंना झापडच खायची आहे, संजय राऊतला न्यायालयाने कशी झापड लगावली हे विसरलात का? १०० कोटींचा मेधा सोमय्यांच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी न्यायालयाने आज समन्स काढले आहे, संजय राऊत हाजीर हो.

पुढे ते म्हणाले की, मेधा किरीट सोमय्यांची याचिका दाखल झाली, ४ जुलै रोजी संजय राऊतला न्यायालयात यावंच लागणार. दरम्यान, उच्च न्यायालय यावर काय निर्णय देतंय? याकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष असणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगीतलं? ग्रामसेवकाचा शहीद जोंधळेंच्या वडीलांना उद्दाम प्रश्न 
कपिल शर्मा शोच्या जागेवर ‘या’ शोचं पुनरागमन, याच शोमधून कपिल अन् बाकी कलाकार झाले फेमस
पंकजा मुंडेना डावलल्यामुळे संतापला कार्यकर्ता; मिडीयासमोरच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now