Share

७५ किमीचा अमरावती ते अकोला महामार्ग बनवला फक्त ५ दिवसांत, महाराष्ट्राच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद

राज्यात काही रस्ते असे आहे की जे खुप खराब झाले आहे आणि त्यांना दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. या कामांना अनेकदा एक महिना सुद्धा निघून जातो. असे असताना एक अशी बातमी समोर आली आहे, जी खुप हैराण करणारी आहे. तसेच अभिमानास्पद सुद्धा आहे. (75 km highway in just 5 days amaravati)

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील ७५ किलोमीटरचा रस्ता हा फक्त ५ दिवसांत पुर्ण झाला आहे. इतकंच नाही, तर या रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे. अमरावती ते अकोला हा मार्ग खुप खराब झाला होता. त्यामुळे येथून प्रवास करणारे प्रवासी सुद्धा याला कंटाळले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात रस्ता निर्मितीचा एक आगळा वेगळा विक्रम झाला आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.

या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम ३ जूनपासून सुरु झाले होते. त्यानंतर फक्त पाचच दिवसांत म्हणजेच ७ जूनपर्यंत हा ७५ किलोमीटरचा रस्ता पुर्णपणे बांधलेला होता. या रस्ता बांधकामासाठी ७२८ कामगारांचं मनुष्यबळ वापरलं गेलं होतं. हा रस्ता खुप कमी वेळात बांधला गेल्यामुळे याची गिनीज बुककडून दखल घेण्यात आली आहे.

या रस्त्याचे बांधकाम राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केले आहे. या कंपनीने महामार्गावरील लोणी ते बोरगावमंजू या ७५ किलोमीटरचे बांधकाम बिटूमिनस काँक्रिट पद्धतीने केले आहे. फक्त पाच दिवसांत हे केल्याने त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.

तसेच राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मला या टीमचं अभिनंदन करायचं आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

तसेच राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या चिकाटी आणि कामाच्या बळावर नवे व्हिजन तयार होत आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे, असे म्हणत नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुसेवालाची हत्या करणारे शुटर पुण्यातले सराईत गुन्हेगार, एकाने १६ व्या वर्षीच केलाय सरपंचाचा हाफमर्डर
सोनाक्षी सिन्हा पडलीये झहीर इक्बालच्या प्रेमात, पोस्टवर कमेंट करत म्हणाली, लव्ह यू… ; जाणून घ्या कोण आहे तो…
सिद्धू मुसेवालाच्या आठवनीत नायजेरियन रॅपरने केले असे काही की…; किस्सा वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now