उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात असे एक प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. इथे एका तरुणाने लग्नानंतर काही दिवसांनी आपल्या मित्रांच्या सल्ल्यानुसार रोज व्हाएग्रा घेणे सुरू केले, परंतू त्याने ओव्हरडोस घेतल्यामुळे त्याच्यासाठी ते खुप घातक ठरले आहे. (man take 200 mg viagra)
तरुणाने व्हाएग्राचा ओव्हरडोज घेण्यास सुरुवात केली होती, ज्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रकरण इतके गंभीर झाले की डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. सध्या परीसरात या प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे.
संबंधित घटना ही प्रयागराजमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणासोबत घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर तरुणाच्या मित्रांनी त्याला सेक्स पॉवर वाढवण्यासाठी व्हाएग्रा घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांचा सल्ला न घेता, त्याने दररोज २५-३० मिलीग्राम व्हाएग्रा घेणे सुरू केले, परंतु जेव्हा काही फरक पडला नाही तेव्हा त्याने मित्रांच्या सांगण्यावरून त्याचा डोस वाढवला. तरूणाने २०० मिलीग्रॅम व्हाएग्राचे सेवन केले, ज्याच्यामुळे त्याची प्रकृतीच बिघडली.
व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधला ताण वाढला आणि २० दिवसांपर्यंत तो ताण तसाच राहिला. यामुळे तो तरुण खूप अस्वस्थ झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याचवेळी, नववधू देखील रागाच्या भरात तिच्या माहेरच्या घरी गेली, परंतु त्यानंतर तिला पुन्हा सासरच्या घरी पाठवण्यात आले.
डॉक्टरांनी ही बाब पाहिल्यानंतर ते चक्रावून गेले आणि त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशननंतर परिस्थिती सामान्य झाली असली तरी आता हा त्रास आयुष्यभर राहणार असल्याचे सांगण्यात आले. तो मुलांना जन्म देऊ शकतो, मात्र ताणाच्या अडचणीला त्याला सामोरे जावे लागेल, असे म्हटले जात आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशननंतर हा तरुण आता आपले सामान्य जीवन जगेल आणि त्याला आणखी कोणतीही समस्या येणार नाही. युरोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. दिलीप चौरसिया यांनी सांगितले की, तरुण आधीच व्हाएग्रा घेत होता आणि लग्नानंतर त्याने त्याचा डोस वाढवला, त्यानंतर त्याची नातेसंबंध ठेवण्याची क्षमता संपली.
त्या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. डॉक्टर लोकांना सल्ला न घेता व्हाएग्रा घेण्यास मनाई करतात. आता रुग्णाची प्रकृती ठीक असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
‘नुपूर पैगंबरांबाबत सत्यच बोलली, तिला सपोर्ट करा, अरबांना शरण जाऊ नका’ डच खासदाराचा भारतीयांना सल्ला
नुपूर शर्मा पैगंबरांबाबत सत्य तेच बोलली, अरब देशांना शरण जाऊ नका; डच खासदाराचा भारतीयांना सल्ला
पांढरे केस, आधाराला काठी; एकेकाळी देशाचे राजकारण गाजवणारे सुरेश कलमाडी आता काय करतात?