नुकताच अशोक सराफ यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखाने पार पडला. त्यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पत्नी निवेदिता सराफही यावेळी आनंदात होत्या. दरम्यान, नुकतीच आपल्या अशोकमामांनी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी बॉलिवूडवर भाष्य केलं होतं.
ते म्हणाले की, मराठी प्रेक्षक चोंदखळ आहेत. तसं नसतं तर दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे कधी चित्रपटात नायक होऊ शकले नसते. प्रेक्षकांना चेहऱ्यापेक्षा त्यांचं काम महत्वाचं वाटतं. बॉलिवूडवर बोलताना ते म्हणाले की, बॉलिवूडच्या दृष्टीनं मराठी माणूस हा नायकाच्या संकल्पनेत बसतच नाही.
मराठी कलाकार हिंदी चांगलं बोलू शकत नाही, असाही हिंदी चित्रपटसृष्टीत गैरसमज आहे. मला बॉलिवूडमध्ये काही चांगल्या भूमिका मिळाल्या पण काही फालतू भूमिकाही मिळाल्या. त्या मी वेळ असल्यानं केल्या. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना म्हणावी तशी किंमत नाही.
रंगभूमीवरचे कलाकार असल्याची जाणीव ठेवून मात्र मराठी कलाकारांना बॉलिवूडकर टरकून असतात. विख्खी, व्याख्या, वुख्खू हे तीन शब्द कानावर पडताच आपल्याला अशोकमामा आठवतात. यामागचाही रंजक किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला. ते म्हणाले की, या चित्रपटात महेशच्या खोट्या बापाची भूमिका करताना त्याचा मित्र अशोक म्हणजे धनाजी वाकडेच्या बंगल्याबाहेर पोहोचतो.
कारमधून उतरल्यानंतर पाईप स्मोकिंग दाखवताना ठसका लागल्याचं दृष्य आहे. बंगल्यात प्रवेश केल्यानंतर बागेत पाणी घालणाऱ्या माळ्याला पाहून अशोक त्याला विचारतो, माळी, मालक कुठेत? तेव्हा, मीच मालक असं उत्तर वाकडे देतात. ते ऐकून धक्का बसल्याचं दाखवण्यासाठी हे तीन शब्द अचानक सुचले, असं अशोक सराफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
सलमान खानला मारण्यासाठी घेतली ४ लाखांची रायफल, पण ‘असा’ फसला प्लॅन, लॉरेन्स बिश्नोईचा मोठा खुलासा
सांगलीतील ३ मित्रांचा भीषण अपघातात मृत्यु, एकाच मोटारसायकलवर चालले होते चौघे
‘अरंगेत्रम’ कार्यक्रमात थिरकली अंबानींची होणारी सुन, नृत्य पाहून सेलिब्रीटीही झाले घायाळ, पहा व्हिडीओ
खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला…