Share

भाजपा प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानाने आखाती देशात भारताविरुद्ध संताप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

bjp

अलीकडेच काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शो मध्ये बोलत असताना भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

याशिवाय, भाजपा दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची माहणी होत होती. प्रेषित पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्मा यांना सोशल मीडियावर बलात्कार व हत्येची धमकी मिळाली होती.

तसेच नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर राजस्थानच्या बुंदीचे मौलाना मुफ्ती नदीम यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली होती. गदारोळानंतर भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. दोघांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे.

याच विधानाचे पडसाद आता आखाती देशात देखील उमटू लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे बहरीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसारख्या आखाती देशात भारताविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, विशेष बाब म्हणजे, भारतासाठी आखाती देशांचं राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. याशिवाय भारताचे आखाती देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियामध्ये ८० लाखाहून अधिक भारतीय राहतात, त्यापैकी बहुतेक GCC देशांमध्ये राहतात.

तिथे भारतीय कामगार इथल्या रोजगारातून पैसे कमावतात. विशेष बाब म्हणजे ते भारताला ४० अब्ज डॉलरहून अधिक रक्कम पाठवतात. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागण्यास मदत होते. असे असतानाच पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे भारताविरोधात संताप व्यक्त केला जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-
भारताला मिळाला दुसरा युवराज! ६ चेंडूंवर ६ षटकार ठोकले अन् १९ चेंडूत बनवल्या ८३ धावा; पहा व्हिडीओ
मुस्लिमांनी लुटली मुस्लिमांची दुकाने; वाचा कानपूर हिंसाचारातील पडद्यामागील सत्य घटना…
“पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ३ तास थांबवले होते”

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now