भाजप नेते त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आताही भाजपच्या एका खासदाराने एक मोठे वक्तव्य केले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी पाकिस्तानबद्दल बोलताना एक खळबळजनक दावा केला आहे. पाकिस्तान लवकरच आपला असेल, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे. (bjp mp rakesh sinha shocking statemnent on pakistan)
मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळावर राकेश सिन्हा लखीसराय येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, त्यांना काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंग आणि त्यांच्या पलायनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, तेथून कोणतेही स्थलांतर नाही, आमच्या सरकारने काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे.
दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांच्या हत्येबाबत ते म्हणाले, पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला भारत घाबरणार नाही. दहशतवादी त्यांची शेवटची लढाई लढत आहेत, आमचे सैन्य सज्ज आहे, ज्या दिवशी शुभ वेळ येईल त्या दिवशी पाकिस्तान सुद्धा आपला असेल. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणार अशी चर्चा होत आहे.
त्याचवेळी खासदार राकेश सिन्हा यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधी दहशतवाद्यांचे गुणगान गाण्यात व्यस्त आहेत हे दुर्दैवी आहे. राकेश सिन्हा देखील बिहारमधील जात जनगणनेच्या निर्णयावर नाराज दिसले. ते म्हणाले की, जनगणना यादीतही जात येतेच.
राज्यसभेचे खासदार सिन्हा म्हणाले की, बिहारमध्ये जातीवादाला प्रोत्साहन देणारे असे कोणतेही काम केले जाऊ नये. जनगणना करायची आहे, हा सर्वपक्षीय निर्णय आहे. परंतू बिहारच्या राजकारणात जातीयवादाच्या नावावर फक्त लोकांना तोडण्याचे काम केले गेले आहे.
त्याचवेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत सांगितले की, ही गंभीर बाब असून हा कायदा झाला पाहिजे. तसेच मोदी सरकारच्या आठ वर्षात केलेल्या कामांची मोजदाद केली आणि गरिबांच्या कल्याणासाठी ही उपलब्धी असल्याचे म्हटले.
महत्वाच्या बातम्या-
गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांची लायकीच काढली; जाहीर कार्यक्रमात म्हणाले…
‘सलमानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
केतकी प्रकरणात राज्यपालांची एंट्री, केस CBI कडे जाण्याची शक्यता; वाचा नेमकं काय घडलं..