बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके (वय ५३) यांचे ३१ मे २०२२ च्या रात्री निधन झाले आहे. कोलकाता येथे लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केकेंच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. (kk postmortem report information)
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराच्या झटक्याने केकेंचे निधन झाले आहे. लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान केके यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मंगळवारी ५ वाजता हा शो सुरु झाला होता. कार्यक्रमानंतर ते आपल्या हॉटेलमध्ये परतले होते. त्यावेळी पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. अशात काही लोकांनी केकेंच्या मृत्युवर संशयही व्यक्त केला होता.
आता केके यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यावरुन त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी ही माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्सर्टनंतर केके मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोस्टमार्ट रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की गायकाला दीर्घकाळापासून हृदयविकाराचा त्रास होता. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, केके यांचा मृत्यू हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह अवरोधित झाल्यामुळे झाला आहे. त्यांच्या मृत्यूमागे कोणतेही षडयंत्र नव्हते. तपासात असेही आढळून आले की गायकाला दीर्घकाळापासून हृदयविकाराचा त्रास होता.
तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी हॉटेल अधिकाऱ्यांशी बोलून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये केके आपली छाती दुखत असल्याचे सांगताना दिसून येत आहे. तसेच त्याच्याआधीच्या फुटेजमध्ये केके हॉटेलच्या कॉरीडोअरमध्ये फिरताना दिसत होते. त्यानंतर अचानक त्यांना छाती दुखण्याचा त्रास होऊ लागला होता.
केके यांच्या जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अशा अचाकन जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कलाकांरांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केके यांनी त्यांच्या गाण्यांनी सगळ्यांनाच भुरळ घातली होती.
महत्वाच्या बातम्या-
प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका’; ज्ञानवापी वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
आयटीआय विद्यार्थ्याला मिळणार थेट सेंकड इयर इंजिनिअरींगला प्रवेश, ट्रेड कोणताही असो…
मुमताजच्या मुलीसमोर फेल आहेत कतरिना आणि मलायका; फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘आतापर्यंत कुठं होतीस’