राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्या अनेकदा ग्लॅमरस फोटोमुळे आणि त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहे, त्याचे कारणही खुप खास आहे. (amruta fadanvis cannes festival photo)
अमृता फडणवीस या सध्या कान्स चित्रपट सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अमृता फडणवीसांचेही ग्लॅमरस फोटो व्हायरल होत आहे. तिथल्या रेड कार्पेटवरील अमृता फडणवीसांचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवाला भारतातील फिल्मी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स हजेरी लावताना दिसत आहे. याच सोहळ्याला अमृता फडणवीसांनीही हजेरी लावली आहे. यावेळी अमृता फडणवीसांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या चित्रपट सोहळ्यातील एका विशेष मोहिमेच्या निमित्ताने अमृता फडणवीसांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. याबाबत अमृता फडणवीसांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यावेळी अमृता फडणवीस वनपीसमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. त्या एका ब्लॅक ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
अन्न, आरोग्य या गोष्टींबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी बेटर वर्ल्ड फंडने एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डॉमेनिक ओयुटारा, राजकुमारी धिदा तलाल, अभिनेता शारोन स्टोन, चार्लि चॅप्लिनची नात कायरा चॅप्लिन यांच्यासोबत अमृता फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवाचे हे ७५ वर्षे आहे. त्यामुळे त्याची जगभरात चर्चा सुरु आहे. या सोहळ्यातील हजेरी लावलेल्या अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे असताना अमृता फडणवीसांनीही त्यांचे फोटो शेअर केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्याचा मुलगा असल्यामुळे…; मराठी सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर आदिनाथ कोठारेचा गौप्यस्फोट
यासिन मलिकला जन्मठेप दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट; शाहिद आफ्रिकीने ओकली गरळ
शिखर धवनला वडिलांनी पोलिसांसमोरच केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण आले समोर