प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आपल्या आवाजामुळे फक्त देशातच नाही, तर जगभरातील लोकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण त्या अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा त्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहे. (asha bhosle on fast food)
मुंबईतील एका कार्यक्रमात आशा भोसले उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आहे. तसेच यावेळी त्यांनी काही फिटनेस टीप्सही दिल्या आहे. पण त्यांची एक फिटनेस टीप चांगलीच चर्चेत आली आहे. ज्याने सगळ्यांनाच हैराण केले आहे. त्यांनी पिझ्झाऐवजी भाकर खा असे सांगितले आहे.
मी लहानपणी जास्त जाड नव्हते. पण फार गोड होती. त्यावेळी दीदी मला कडेवर घेऊन जायच्या. तिला मी फार आवडायची. पण काही वर्षानंतर मी जाड झाली. तो जाडपणा बरेच वर्षे राहिला. त्यावेळी माझ्या उंचीच्या मानाने माझं वजन जास्त होतं. त्यावेळी मी काही खाल्ल तर मला गाणं गाता येत नव्हतं. मी चार-पाच गाणी दिवसातून गायचे, असे आशा भोसले यांनी म्हटले आहे.
मी वयाच्या ६० वर्षापासून माझं वनजन ६५ किलो ठेवलं. आतापर्यंत ते तेवढंच आहे. मी जेव्हा अमेरिकेत होते, तेव्हा काही बायका रडत असल्याच्या मी पाहिल्या. मी थोडं पुढे जाऊन बघितले तर मला त्यांच्या रडण्याचे कारण समजले. त्यांची मुलं खूप जाड होती. त्यांना चालताही येत नव्हते, असे आशा भोसले यांनी म्हटले आहे.
तसेच त्यानंतर मी तिथूनच माझ्या सूनेला फोन केला आणि सांगितलं की माझ्या नातवाला बंद पाकिटातील काहीही खायला देऊ नको. त्याला फक्त वरण भात पोळी देत जा. लहान मुलांचे सोडा, आपण सर्वचजण जाड आहोत, आपण चालायला हवं. स्वत:साठी वेळ काढायला शिका, असे आशा भोसले यांनी म्हटले आहे.
अनेक लहान मुलं तुमचं पाहून खायला शिकतात. जर तुम्ही त्यांच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील तेच खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही? भाकरी खात जा. तुमचं जितकं खाणं चांगलं असेल तितकं तुम्ही सुंदर दिसाल, असेही आशा भोसले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ट्रेकींगसाठी लोणावळ्यात गेलेल्या तरूणाचा मृतदेह जंगलात सापडला; शोधणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी करताच केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले…
शेणाचा अनोखा फायदा! ओडिशातील गृहिणीने सुरू केला शेणापासून ‘हा’ व्यवसाय, कमावते बक्कळ पैसा