सध्या प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सध्या जोरदार कामगिरी करत असून चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटांनाही मागे सोडताना दिसून येत आहे. ( pravin tarde big fan of ss rajamauli)
आता या आठवड्यात प्रवीण तरडे यांचा आणखी एक चित्रपट येतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारीत ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येणार आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.
सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे यांनी एका वेबपोर्टलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. तसेच आपल्या ऑफिसमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा एक फोटोही आहे, असे प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे.
दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांना आपण आदर्श मानत असल्याचे प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या ऑफिसमध्ये त्यांचा एक फोटोही लावण्यात आला आहे. मात्र हा फोटो लावण्यामागेही एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मी एकलव्य आहे, त्यांचा. माझ्या जवळच्या मित्रानांच याबाबत माहिती आहे. माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला राजामौलींचा एक मोठा फोटो दिसेल. मागील सात वर्षांपासून तो फोटो आहे. मी रोज ऑफिसमध्ये जात असताना मिनीटभर तरी त्या फोटोकडे बघतो आणि मगच आतमध्ये जातो, असे प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रवीण तरडे यांनी तो ऑफिसमध्ये का लावला याचे कारणही सांगितले आहे. त्या माणसाने जशी त्याच्या प्रादेशिक चित्रपटाची दखल घ्यायला अख्ख्या जगाला भाग पाडलं, तशीच दखल माझ्या चित्रपटाचीही लोकांनी घ्यावी, असं मला वाटतं. असेच सिनेमे आपण निर्माण करत राहणार, असे प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आई मी सुट्टीवर येतोय…जवानाचे शब्द ठरले अखेरचे; नरळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
हम साथ साथ है, म्हणत बीडमध्ये सात एचआयव्ही बाधित जोडप्यांचा शुभविवाह; जिल्हा प्रशासनाने केले कन्यादान
सच्चा शिवसैनिक, बेळगाव सीमाप्रश्नी आंदोलनात मोलाची भूमिका; जाणून घ्या ‘मावळा’ संजय पवारांबद्दल….