महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील जागांचे गणित पाहिल्यास भाजप २ जागांवर आपले उमेदवार सहजपणे पाठवू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका जागेवर आपला उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवू शकतात. (sanjay pawar talk about uddhav thackeray)
महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काही सदस्य अतिरिक्त असल्याने दोघेही ६ जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असून उमेदवार उभे करणार आहेत. महाविकास आघाडीकडून सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांचे नाव चर्चेत होते. शिवसेना त्यांना पाठिंबा देईल आणि महाविकास आघाडीकडून ते राज्यसभेत जाणार अशी चर्चा होती.
अशात राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच ती घोषणा करण्यात येणार आहे. यानंतर संजय पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी माझ्या नावाची घोषणा केली आहे, याचा मला खुप आनंद झाला आहे. जो शिवसैनिक तीन वर्षांपासून अखंड कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात काम करतोय, जो पंधरा वर्ष नगरसेवक आहे, चौदा वर्ष जिल्हा प्रमुख आहे. शहर प्रमुख होता, जो सर्वसामान्य शाखा प्रमुखापासून इथपर्यंत पोहचला, असं कोणत्या पक्षात होतं. हे फक्त शिवसेनेत होतं, असे संजय पवार यांनी म्हटले आहे.
मला संधी दिल्याबद्दल शिवसेनेला सलाम, तसेच ज्या लोकांमुळे मला संधी मिळाली, त्या लोकांचेही मनापासून आभार. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे. तो मी साध्य करुन दाखवणार, असे संजय पवार यांनी म्हटले आहे.
तसेच उमेदवारी मिळाल्याने मला तयारी करावी लागणार आहे. सर्व कागदपत्रांची आज पुर्तता होईल. काही अडचण नाही. संजय राऊत यांच्यासोबतच मी उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहे, असे देखील संजय पवार यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे हे आमचे बॉस अन् बॉस इज अल्वेज राईट, ते काहीही निर्णय घेतील तो मानणारा शिवसैनिक मी आहे, असेही संजय पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सच्चा शिवसैनिक, बेळगाव सीमाप्रश्नी आंदोलनात मोलाची भूमिका; जाणून घ्या ‘मावळा’ संजय पवारांबद्दल….
५ वर्षांनी तारक मेहता’मध्ये पुन्हा दिसणार जुनी दयाबेन; निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी
मालवणातील तारकर्ली बीचवर मृत्यूचे तांडव; २० पर्यटकांनी भरलेली बोट भर समुद्रात बुडाली