मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका ६१ वर्षीय व्यक्तीचा आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंधादरम्यान मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी सकाळी येथील एका हॉटेलमध्ये आपल्या जोडीदारासोबत संभोग करताना ६१ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडला आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
सध्या त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. मृत व्यक्तीने कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये सकाळी 10 वाजता एका 40 वर्षीय महिलेसोबत चेक इन केले जी त्याची मैत्रीण असल्याचा दावा त्याने केला होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. काही वेळाने महिलेने हॉटेलच्या रिसेप्शनशी संपर्क साधला आणि तिचा पार्टनर बेशुद्ध झाल्याचे सांगितले.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला सायन येथील रुग्णालयात दाखल केले, तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर त्याच्या सहकारी महिलेला कुर्ला पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.
महिलेने सांगितले की, मृत हा वरळी येथील रहिवासी असून एका खाजगी कंपनीत कामाला होता. महिलेच्या हवाल्याने पोलिसांनी सांगितले की, त्याने संभोग करताना दारू पिण्याचा प्रयत्न केला आणि तो जाग्यावरच बेशुद्ध झाला. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. संभोग करण्यापूर्वी त्याने काही औषधही घेतले होते का?
जर औषध घेतलं नसेल तर नेमके त्याच्या मृत्युचे कारण काय? ही सर्व माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समजेल. याचाही तपास करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये आपल्या पार्टनरसोबत शारिरीक संबंध बनवताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! मुंबई संघातून अर्जुन तेंडूलकर बाहेर, ‘या’ क्रिकेटरच्या भावाला संघात मिळाली जागा
केतकी चितळे आता पुरती अडकली; न्यायालयाच्या कठोर आदेशाने पाय आणखी खोलात
बिग ब्रेकींग! खाजगी वाहनांना टोल कायमचा माफ होणार, ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय
जबरदस्त! ७५ पैशांच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे झाले २७ कोटी