मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मधील 69 वा सामना दिल्ली कॅपिटल्सवर 5 गडी राखून जिंकला. मुंबईच्या या विजयासह आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे, तर दिल्लीचा प्रवास इथेच संपला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 159 धावा केल्या.
एमआयने 5 चेंडू राखून ही धावसंख्या गाठली. एक वेळ अशी आली होती की मुंबई हा सामना हरणार असे वाटत होते, पण त्यानंतर टीम डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. डेव्हिडशिवाय इशान किशनने सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली.
आरसीबीशिवाय गुजरात, लखनौ आणि राजस्थानने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बंगळुरू संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. त्यांनी 14 पैकी 8 सामने जिंकले आणि 16 गुण मिळवले आहेत. लखनौ आणि राजस्थानने प्रत्येकी 9 सामने जिंकले तर गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले.
विशेष बाब म्हणजे गुजरात आणि लखनौ यांनी या लीगमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे आणि पहिल्याच सत्रात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. आता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स क्वालिफायर-1 मध्ये 24 मे रोजी आमनेसामने असतील तर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 25 मे रोजी एलिमिनेटरमध्ये आमनेसामने होतील.
दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हंगामातील 69 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 7 विकेट्सवर 159 धावा केल्या, त्यानंतर मुंबईने 5 चेंडू राखून 5 विकेट गमावून लक्ष्य गाठले. दिल्लीला 14 सामन्यांमधला 7 वा पराभव पत्करावा लागला आणि या आयपीएलमध्ये विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. मुंबईने 14 सामन्यांत चौथा विजय नोंदवला.
मुंबईचा संघ 10 संघांच्या गुणतालिकेत तळाला असला तरी त्यांच्यामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असं म्हणायला काही हरकत नाही. विशेष म्हणजे या सामन्यात बंगळुरूचे चाहते मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने अशा विजयासह हंगामाचा निरोप घेतला पण दिल्लीचा पराभव करत आरसीबीचा आशा कायम ठेवण्यात मुंबईचे मोठे योगदान आहे.
महत्वाच्या बातम्या
‘हा सर्व प्रकार काल्पनिक’ म्हणत कोर्टाने संदीप देशपांडेची कस्टडी मागणाऱ्या पोलिसालाच झापलं
रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस, सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, पहा फोटो
हिंदी चित्रपटांना टक्कर देत धर्मवीर ठरला सुपरहिट; पहील्याच आठवड्यात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
मोदींचा आणखी एक मास्टस्ट्रोक; पेट्रोल डिझेल पाठोपाठ घरगुती गॅसही २०० रूपयांनी स्वस्त होणार