लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे असा चित्रपट आला आहे. सध्या हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे किती प्रसिद्ध होते आणि त्यांनी लोकांसाठी किती कामे केली आहे हेही समोर आले आहे. (dharmveer one week collection)
१३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खुप धूमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका निभावली आहे.
हा चित्रपट ४०० हून अधिक स्क्रीनवर झळकत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड लावले होते. तसेच याचवेळी हिंदी चित्रपटसृष्टीचे चित्रपटही रिलीज झाले होते. पण त्यांचा धर्मवीरच्या कमाईवर काहीच परीणाम झाला नाही. अगदी पहिल्या दिवसापासून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.
आता धर्मवीरच्या पहिल्या आठवड्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शनसमोर आले आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करुन हिंदी चित्रपटांकडे वळत असल्याचे बोलले जात होते. पण धर्मवीरने मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले असून या चित्रपटाच्या शोला तुफान गर्दी असल्याचे दिसून येत आहे.
यावर आता झी स्टुडिओजच्या प्रमुखांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मराठी चित्रपटासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. धर्मवीर चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींची कमाई केली आहे. आपण नेहमी ऐकतो मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही, पण सिनेमा दर्जेदार असेल, तर स्वत: सिनेमागृहांकडूनच याबाबत विचारणा होते, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच आम्ही ठरवलं होतं, त्यापेक्षा जास्त शोज सुरु आहे. सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षक सुद्धा तो डोक्यावर घेतात. त्याचंच उदाहरण म्हणजे धर्मवीर, असेही झी स्टुडिओजच्या प्रमुखांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी कमाई करत यशाचे शिखर गाठेल असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्लेऑफमधून बाहेर गेलेल्या मुंबईला आणखी एक धक्का, पुढच्या IPL मध्येही अपयशच हाती?
‘गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या’; केतकीच्या प्रकरणावर आव्हाडांची पोस्ट
शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातलेल्या मोदींच्या मंत्र्याच्या पुतण्याचा गाडीवर झाड पडून मृत्यू