Share

‘या’ कारणामुळे प्रचंड भडकला गुजरातचा स्टार खेळाडू, ड्रेसिंग रुममध्ये जाऊन हेल्मेट फेकलं अन् बॅटही तोडली

IPL २०२२ चा ६७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गुजरातने १६८ धावा केल्या होत्या. अशात हा सामना बंगलोरने ८ विकेट्सने १७० धावा करत जिंकला. (mathew wade angry in dressing room)

या सामन्यात बंगलोरच्या विराट कोहलीने ५४ चेंडूत ७३ धावा ठोकल्या. तसेच त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला आहे. त्यामुळे विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे म्हटले जात आहे. अशात या सामन्यातील आणखी एका खेळाडूची चांगलीच चर्चा रंगली आहे तो म्हणजे गुजरातचा मॅथ्यू वेड.

गुजरातचा संघ फलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकात शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर मॅथ्यू वेड फलंदाजीला आला. मात्र तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. तो १३ चेंडूत फक्त १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने वेडला एलबीडब्ल्यू आऊट केले.

https://twitter.com/Sunilkumar6975/status/1527315897479622661?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527315897479622661%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Fipl-2022-matthew-wade-throws-helmet-smashes-bat-in-dressing-room-after-controversial-dismissal-in-rcb-gt-match-watch-video-101652972941125.html

जेव्हा तो बाद झाला, तेव्हा मैदानावरील अंपायरच्या निर्णयावर वेड खूश नव्हता आणि त्याने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की मॅक्सवेलच्या अॅक्शनमुळे, चेंडू ऑफ स्टंपच्या कोनासह आत गेला, वेडला लॅप स्वीप करायचा होता आणि चेंडू पूर्णपणे चुकला.

चेंडू बॅटला लागला नाही आणि ग्लोबलाही लागला नाही. चेंडू मिडल आणि लेग स्टंपला लागणार असल्याचे थर्ड अंपायरच्या निदर्शनास आले. त्यामुळे अंपायरने बादचा निर्णय कायम ठेवला होता. अंपायरच्या या निर्णयावर तो खुप संतापलेला होता आणि नाखुश होता.

मॅथ्यू जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा तिथे त्याने सर्वांसमोर राग काढला. त्याने तिथे हेल्मेट फेकले आणि त्याच्या बॅटलाही त्याने खाली आपटले. त्यावेळी त्याची बॅटही तुटली. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
हल्मेट घालूनही चालकाला भरावा लागू शकतो २००० रुपयांपर्यंत दंड; जाणून घ्या काय आहे नियम
राज्यसभेच्या निमीत्ताने पवारांकडून संभाजीराजेंची कोंडी? मराठा राजकारण संपवण्याचा डाव?
सत्तेचा माज! शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले; वाचा नेमकं काय प्रकरण

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now