पवारसाहेब मोठे नेते, केतकीला वार्निंग देऊन सोडून द्यायला पाहिजे; बड्या भाजप नेत्याने केली मागणी

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. अनेकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. (pankaja munde on ketki chitale case)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं होतं. अजूनही केतकी पोलिसांच्याच ताब्यात आहे. तिच्यावर राजकीय नेतेही टीका करताना दिसून येत आहे. पण केतकी मात्र तिच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणावर भाजप नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी केतकी चितळेची पाठराखण केली आहे. तसेच केतकी चितळेला एक वॉर्निंग देऊन तिला सोडून द्यावं, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

शरद पवार हे मोठे नेते आहे. केतकीचा विचार करता तिला एक वॉर्निंग देऊन सोडून दिलं पाहिजे, असे मत पंकजा मुंडे यांनी केतकी चितळे प्रकरणावर मांडलं आहे. पंकजा मुंडे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हा जरी व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असला तरीही सर्वांचा सन्मान राखला पाहिजे. टीका जरी करायची असली तरी बिभत्सपणे करु नये. त्या पोस्टमध्ये बिभत्सपणा मला आढळला, मी त्याची निंदा करते. मी राजकारण लहानपणासून पाहिलंय. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, त्यावेळी लोक पेपरात लिहायची. तेव्हाही अनेकदा भाषा घसरायची, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

आम्ही बाबांना अनेकदा विचारायचो की अशा भाषेत लिहिलेलं तुम्ही सहन कसं करता? तेव्हा ते म्हणायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतू आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतू सध्याचं तिचं वय पाहता तिला एक वॉर्निंग देऊन तिला सोडून दिलं पाहिजे. पवारसाहेब मोठे नेते आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरे पुण्यातून निघताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यालयातच भिडले नेते
राजेशाही थाटात पार पडला PSI पल्लवी जाधवचा विवाह सोहळा, जाणून घ्या तिची संघर्षकथा..
‘पवारांनी संस्कृतीवर बोलू नये, तुमची शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल’; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका