Share

२ जीच्या निराशेतून निघून भारताने वेगाने ५ जी आणि ६ जीकडे वाटचाल केलीये- पंतप्रधान नरेंद्र मोदी

narendra-modi-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीटही काढले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मंत्री उपस्थित होते. (narendra modi talk about 5g and 6g)

कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने २५ वर्षे पूर्ण केली ही खुप आनंदाची गोष्ट आहे. आज देश पुढील २५ वर्षांच्या रोड मॅपवर काम करत आहे. काही काळापूर्वीच मला देशाचे स्वनिर्मित ५ जी-टेस्टबँड राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळाली होती.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ५ जी टेस्टबँड देशातील खेड्यापाड्यात ५ जी तंत्रज्ञान आणण्यात आणि विकास कामात मोठी भूमिका बजावेल. २१ व्या शतकातील ही कनेक्टिव्हिटी देशाची गतिविधी ठरवेल. ५ जी तंत्रज्ञान देशाच्या प्रशासनात सकारात्मक बदल घडवून आणेल.

२ जी घोटाळ्याचा संदर्भ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २ जी युगातील निराशा, भ्रष्टाचार यातून निघून देश वेगाने ३ जी वरून ४ जी आणि आता ५ जी, ६ जी वर चालला आहे. गरीब कुटुंबातील गरीबांपर्यंत मोबाईल उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही देशातच मोबाईल फोनच्या निर्मितीवर भर दिला. परिणामी, मोबाईल उत्पादन युनिट २ वरून २०० पेक्षा जास्त झाले.

५ जी तंत्रज्ञान येत्या दिड दशकात भारताच्या अर्थव्यवस्थेत ४५० अब्ज डॉलर्सचे योगदान देईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फक्त इंटरनेटचाच नाही, तर रोजगार आणि विकासाचा वेग वाढणार आहे. असेच ५ जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सामूहिक विकासाची गरज आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

तसेच या दशकाच्या अखेरपर्यंत आपल्याला ६ जी सेवा सुरु करता येईल का? त्यादृष्टीने आपले टास्कफोर्स काम करत आहे. स्टार्टअप्स जलद तयार करण्याचा आणि दूरसंचार क्षेत्रात तसेच ५ जी तंत्रज्ञानामध्ये जागतिक चॅम्पियन बनण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय? ते उध्वस्त करा; मनसेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
ज्ञानवापी मशीद प्रकरण; ‘या’ पुराव्यामुळे हिंदू पक्षकारांच्या दाव्याला बळकटी मिळणार
आजवर सोज्वळ भूमिका करणारी प्राजक्ता माळी बोल्ड वेब सिरीजमुळे मराठी प्रेक्षकांच्या निशाण्यावर

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now