Share

देवेंद्र फडणवीसांच्या ‘ठोक सभे’ला मुख्यमंत्री ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर; वाचा काय म्हणाले…

udhav thackeray

शनिवारच्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर काल लगेच काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावातील नेस्को मैदानावर हिंदी भाषी महासंकल्प सभेमध्ये शिवसेनेवर जहरी शब्दांमध्ये टीका केली.

सभेत बोलताना अनेक मुद्यांवर फडणवीसांनी शिवसेनेला घेरले. ‘मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही तेजस्वी ओजस्वी ऐकायला मिळेल, असं वाटलं होतं. मात्र अख्खी सभा संपली पण लाफ्टर काही थांबेना. शंभर सभांची बाप सभा असेल, असं सेनेने सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांची सभा मास्टर सभा नव्हे ती तर लाफ्टर सभा होती, अशा खोचक शब्दात फडणवीस यांनी पलटवार केला.

यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. फडणवीस यांनी केलेल्या टीकांना खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. एका वाक्यात मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

‘त्यांना गुरु शिष्याचे नाते सांगायची गरज नाही’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. काल ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट पाहण्यासाठी नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स मल्टिपेक्स चित्रपटगृहात उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय तसंच शिवसेना आमदार- नेत्यांसाठी विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते.

विशेष बाब म्हणजे या स्क्रिनिंगला उद्धव ठाकरे यांच्यासह यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच शिवसेनेचे मंत्री-नेते एकनाथ शिंदे, पक्षाची काही वरिष्ठ नेते, काही आमदार-खासदारही उपस्थित होते. यासोबतच चित्रपटातील कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ अशी टीमही उपस्थित होती.

दरम्यान, ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी चित्रपटाबद्दल भाष्य केलं. सोबतच फडणवीस यांच्यावर देखील पलटवार केला.

महत्त्वाच्या बातम्या
‘मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था,मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु?’
आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकसाठी ‘अनिरुध्द’ ची पोस्ट; हिरो नेमका कोण? दिलं उत्तर
मी फक्त धोनीसोबतच नाही तर ‘या’ लोकांसोबतही रिलेशनशिपमध्ये होते; धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा
अँड्रू सायमंड्स चक्क ११ दिवस राहिला होता बिग बॉसच्या; स्वत:च सांगितले होते तिथे राहण्याचे कारण

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now