ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाच्या बातमीने प्रत्येकालाच धक्का बसला आहे. अँड्र्यू सायमंड्स आता या जगात नाही याच्यावर कोणाला विश्वास बसत नाहीये. अँड्र्यू केवळ त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळेच नाही तर ओठांवर पांढरी क्रीम आणि वेणी घातलेल्या केसांमुळेही खूप चर्चेत होता. (andrew symonds propose pooja mishra)
तसेच क्रिकेट व्यतिरिक्त, त्याने बॉलीवूडमध्ये काम केले आणि बिग बॉस ५ मध्ये देखील तो दिसला. अँड्र्यू सायमंड्स सलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस ५ मध्ये पाहुणा स्पर्धक म्हणून सामील झाला होता. तो जवळपास ११ दिवस त्याच घरात राहिला होता.
अँड्र्यू सायमंड्सला हिंदी येत नसल्याने पूजा मिश्राला त्याच्या मदतीसाठी आणण्यात आले होते. अँड्र्यू सायमंड्सने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, तेव्हा आत काय होईल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. ११ दिवस राहिल्यानंतर अँड्र्यू सायमंड्सचा जग आणि कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याने सर्व गोष्टी केल्या आणि अनेक गोष्टी शिकल्या ज्या त्याने कधीही समजून घेतल्या नव्हत्या.
अँड्र्यू सायमंड्सने तर बिग बॉसच्या घरात पूजा मिश्राला प्रपोज सुद्धा केले होते. प्रत्यक्षात हे एका टास्क दरम्यान घडले. दिलेल्या टास्कदरम्यान अँड्र्यू सायमंड्सने पूजा मिश्राला फूल देऊन प्रपोज केले. टास्कमध्ये अँड्र्यू सायमंड्सला दोन लोकांना प्रपोज करण्यास सांगितले होते. पूजा मिश्रा व्यतिरिक्त त्याने शोनाली नागराणीला अगदी देसी शैलीत प्रपोज केले. अँड्र्यू सायमंड्सचा देसी स्टाइल पाहून घरातील सदस्यही थक्क झाले.
अँड्र्यू सायमंड्स ११ दिवसांनंतर ‘बिग बॉस’च्या राहिला होता. पण त्यानंतर जेव्हा तो बाहेर पडला, तेव्हा आपण या ११ दिवसात अनेक गोष्टी शिकल्याचे त्याने म्हटले होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो घरी पोळ्यांसोबत भारतीय भाज्या बनवायला शिकला होता.
अँड्र्यू सायमंड्सने सांगितले होते की, बिग बॉसमध्ये आल्यानंतर मला कळले की भारतीय लोक किती संवेदनशील आहेत. हा खेळ अँड्र्यू सायमंड्ससाठी आयुष्य बदलणारा होता. ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतरच कुटुंबाचे महत्त्व काय आहे हे त्याला कळले, असे त्याने सांगितले होते.
अँड्र्यू सायमंड्सला जेव्हा विचारण्यात आले की तो ‘बिग बॉस’मध्ये का गेला? तेव्हा त्याने हैराण करणारे उत्तर दिले. तो म्हणाला, मला भारतात यायला आवडते. माझे येथे बरेच मित्र आहेत आणि मी येथे चांगला वेळ घालवतो. माझे भारताशी नाते आहे आणि मी येथे येत राहीन.
महत्वाच्या बातम्या-
सोज्वळ दिसणारी प्राजक्ता दिसली प्रचंड बोल्ड अवतारात इंटिमेट सीन देताना; व्हिडीओ पाहून घाम फुटेल
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, देहू संस्थानने ‘तुका म्हणे’ शब्दांवर घेतला आक्षेप; प्रकरण पोलिसांत…
कम्युनिस्ट नेता असणाऱ्या शिक्षकाने तब्बल ६० विद्यार्थीनींचे केले लैंगिक शोषण; देशात खळबळ