केरळच्या मलप्पुरममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मलप्पुरममधील वनिता पोलिस स्टेशनमध्ये सेवानिवृत्त शिक्षक आणि सीपीआय नेते के व्ही शशीकुमार यांच्या विरोधात विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीपीआय नगरसेवकावर अनेक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. (communist leader rape 60 students)
आरोपी गेल्या ३० वर्षांपासून हे घृणास्पद कृत्य करत असल्याची तक्रार ६० हून अधिक मुलींनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आरोपी यापूर्वी बेपत्ता झाला होता. मात्र, आठवडाभरानंतर तो आता पकडला गेला आहे.
सरकारी अनुदानित मुलींच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीने याप्रकरणी तक्रार केली आहे. मलप्पुरमच्या वनिता पोलिस ठाण्यात मंगळवारी पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हा इतर माजी विद्यार्थीनींनी त्यांच्या शालेय दिवसांतील भीषण घडामोडी पोलिसांना सांगितल्या.
या प्रकरणात पक्षाची बदनामी झाल्यामुळे सीपीआयने आरोपीला सदस्यत्वातून बडतर्फ केले आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर शशीकुमार फरार झाला होता. मात्र, तो पकडला गेला. केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांनी सार्वजनिक शिक्षण संचालक आयएएस बाबू यांना शाळा व्यवस्थापनातील त्रुटींची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मलप्पुरम महिला पोलिस ठाण्यात पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर शशीकुमार फरार झाला. आठवडाभरानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तीन वेळा मलप्पुरम नगरपालिकेचे नगरसेवक शशीकुमार यांनी मार्च २०२२ मध्ये सेंट जेमास गर्ल्स उच्च माध्यमिक विद्यालयातून निवृत्ती घेतल्यानंतर शेवटच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट केली होती.
शशीकुमार यांनी केलेल्या पोस्टवर शाळेच्या एका माजी विद्यार्थीनीने #MeToo कमेंट केली. त्यानंतर अनेक मुलींनी शिक्षकाचा पर्दाफाश केला. शशीकुमारला मांजेरी पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांना मुथंगा येथील एका ओळखीच्या घरातून पकडले होते.
महत्वाच्या बातम्या-
मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेला क्रिकेटपटू सायमंडस; आकडा वाचून डोळे पांढरे होतील
हिंदूंबाबत गरळ ओकणारा उस्मानी अजूनही मोकाटच; कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे?
….तर सरकारमधून पायउतार व्हा; ठाकरे सरकारविरोधात अण्णा हजारे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा