शेततळ्याजवळ तीन मुलांच्या चप्पला दिसल्या अन् अख्खं सोलापूर हादरलं; घडलेली घटना वाचून बसेल धक्का

लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. ते कधी कुठेही खेळायला जाऊ शकतात. त्यामुळे अनेक धक्कादायक घटनाही घडू शकतात. आता अशीच एक घटना सोलापूरमधून समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (three childrens death in solapur)

शेततळ्याजवळ खेळत असताना त्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. संबंधित घटना सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ इथं घडली आहे. ही तिन्ही मुलं अवघ्या ७ ते ८ वर्षांची होती. या तिन्ही चिमुरड्यांच्या मृत्युमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात ही घटना घडली आहे. शेततळ्यामध्ये दोन सख्ख्या भावांसोबत त्यांच्या लहान मित्राचाही मृत्यु झाला आहे. शेततळ्याजवळ हे मुलं खेळायला गेली होती. तिथे खेळत असताना शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे.

संबंधित घटना ही दुपारी ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय ७०), सिद्धेश्वर भरत निकम (वय ७) आणि विनायक भरत निकम (वय ८) अशी त्या तिन्ही मुलांची नावे होते. तसेच सिद्धेश्वर आणि विनायक हे सख्ख्ये भाऊ होते.

मुकेश हिंगमिरे हे पुण्यात चालक म्हणून काम करतात. त्यांची बहिण रेश्मा भरत निकम आणि त्यांचे पती भरत निकम हे मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहतात. पण सध्या दोघेही पती-पत्नी कामानिमित्त शेटफळ येथील महेश डोंगरे यांच्या शेतात शेत मजूर काम करतात.

रेश्मा निकम आणि भरत निकम यांना सिद्धेश्वर आणि विनायक अशी दोन मुले होती. तर मुकेश हिंगमिरे यांच्या मुलाचे नाव कार्तिक होते. मुकेश यांनी कार्तिकला बहिण रेश्माकडे खेळण्यासाठी सोडले होते. दुपारच्या सुमारास रेश्मा कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी तिन्ही मुलं घरात खेळत होती.

रेश्मा जेव्हा घरी आली, तेव्हा त्यांना मुलं दिसली नाही. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केली. यावेळी रेश्माने मुकेशलाही कॉल करुन याबाबत माहिती दिली. जनार्दन डोंगरे यांच्या शेततळ्याजवळ त्या मुलांची चप्पल आढळून आली. शेततळ्यात पाहिले असता तिन्ही मुलं शेततळ्यात आढळून आली. त्यांना त्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महत्वाच्या बातम्या-
‘तुरुंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्यानी सरकारचे आभार मानले पाहिजे’
संगीत क्षेत्रातून आणखी एक दुःख बातमी; प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं निधन
चित्रपट निर्मात्यांनी वडिलांचे 1.25 कोटी बुडवले, अमजद खान यांच्या मुलाने सांगितले किस्से