आमिर खानच्या मुलीने बिकीनीवरच साजरा आपला वाढदिवस; बोल्ड फोटो पाहून लोकं म्हणाले..

आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रिटी हटके लूक करताना दिसतात. तसेच त्या सेलिब्रिटींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या सेलिब्रिटीच नाही, तर त्यांची मुलं सुद्धा असे काही करतात, ज्यामुळे ते चर्चेत येत असतात. (ira khan birthday party)

आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते आणि अनेकदा तिच्या हटक्या ड्रेसिंगमुळे लोकांना ती आश्चर्यचकित करते. त्याचबरोबर आमिर खान देखील आपल्या मुलीसोबत चांगला वेळ घालवताना दिसतो. त्यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नुकताच आयरा खानचा वाढदिवस होता आणि यावेळी मिस्टर परफेक्शनिस्टही आपल्या मुलीसोबत होता. आमिर खानने आपल्या मुलीचा वाढदिवस मुलगा आझादसोबत एकत्र साजरा केला, ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर लोकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत.

हा फोटो इन्स्टंट बॉलिवूडच्या ऑफिशियल इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये आयरा तिचे वडील आमिर खान आणि भाऊ आझादसोबत दिसत आहे. फोटोमध्ये आयराने बिकीनी घातली आहे, त्यामुळे हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

तसेच या बर्थडे पार्टीवेळी आमिर आणि आझाद शर्टलेस आहेत. फोटो पाहून असे दिसते की सर्वजण पूलमध्ये एन्जॉय करत होते. फोटोमध्ये तुम्ही आयराला केकवरची मेणबत्ती फुंकताना पाहू शकता. या पोस्टवर लोकांच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींना कुटुंबातील हे बॉन्डिंग आवडले आहे, तर काहींनी आमिर आणि आयराला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

कमेंट सेक्शनमधील बहुतेक लोक आयराच्या लूकवर नाराज होते. पोस्टवर टिप्पणी करताना, एका वापरकर्त्याने लिहिले की, कितना पारिवारीक माहौल है. त्याच वेळी, दुसरा वापरकर्ता लिहितो, यांनी तर स्विमिंगपूलमध्येच बर्थडे पार्टी केली. एकाने लिहिले की, असा कोण वाढदिवस साजरा करतं?

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंचा बाप सुद्धा माफी मागितल्या शिवाय अयोध्येत येऊ शकत नाही; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
डॉक्टरेट सोडून अभिनेता होण्यासाठी आला होता मुंबईत, आता पृथ्वीराजमध्ये ‘मोहम्मद घोरी’ बनून सगळ्यांवर पडतोय भारी
‘पृथ्वीराज’मध्ये काम करण्यापूर्वी मानुषी छिल्लरने गाळला खूप घाम, तब्बल नऊ महिने घेतलं ट्रेनिंग