नवनीत राणांनी केलं न्यायालयाच्या ‘त्या’ अटींचं उल्लंघन; पोलिस पुन्हा करु शकतात अटक

गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा चांगल्याच चर्चेत आल्या आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच आता त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. (navneet rana could be arrested)

आता नवनीत राणा पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्रमक झाल्या. तुरुंगात आपल्याला अन्यायकारक वागणूक दिली गेली. मी याबाबत दिल्लीत तक्रार करणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. तसेच माझ्याविरोधात राज्यातील कुठल्याही भागातून निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे.

अशात नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधून न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी चर्चा आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानही दिले होते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या नियमांचे आणि अटींचे उल्लंघन केले आहे, असे म्हटले जात आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी साधलेला संवादाची आम्ही माहिती घेणार आहोत. राणा दाम्पत्य यांना जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने काही अटींवर हा जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आता अटींचे उल्लंघन झाले असेल तर आम्ही योग्य ती कारवाई करु, अशी माहिती विशेष सहकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.

तसेच मीडियासोबत राणा दाम्पत्य यांनी साधलेल्या संवादाची माहिती आम्ही घेणार आहोत. आवश्यक वाटल्यास आम्ही जामीन रद्द करण्यासाठीही न्यायालयात तक्रार अर्ज करु, असेही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा नवनीत राणांना अटक होण्याची शक्यता आहे.

नवनीत राणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना काही बंधने लावली होती. पण तरीही नवनीत राणांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यामुळे त्यांचा जामीन रद्दही होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या-
मातृदिनानिमित्त आईचे उत्तम उदाहरण! लहान वयात पतीचा मृत्यू, शेती करून मुलांना बनवले अधिकारी
प्रसिद्ध गायिकेवर झाला सामूहिक बलात्काराचा प्रयत्न, म्हणाली, मला गाण्यासाठी बोलावलं आणि…
लॉकअपचा विजेता मुन्नवर फारुकीचे आयुष्य होते वादग्रस्त, कधी रडला तर कधी हसला