‘जो कोणी आडवा येईल त्याला सरळ करा’; भडकलेल्या अजितदादांचे कठोर आदेश

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्या रोकठोक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे अनेक किस्से असेही आहेत, की ते एखादी घटना घडली असेल तर त्याचा निकाल तिथेच लावून ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देत असतात. (ajit pawar order to baramati police)

आता अजित पवारांचा असाच एक किस्सा समोर आला आहे. त्यांच्या रोकठोक स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन घडून आले आहे. बारामतीत अनेक नागरिक त्यांच्या तक्रारी घेऊन अजित पवारांना भेटत असतात. तसेच यावेळी अजित पवारही त्यांनी शक्य ती मदत करत असतात.

अशात एकाने जागेची मोजणी सुरु असलेली बाब निदर्शनास आणून देत एक तक्रार केली होती. दोन गटात वाद होत असून त्यामुळे समोरचा ऐकत नाहीये, अशी तक्रार एका व्यक्तीने अजित पवारांकडे केली आहे. त्यानंतर अजित पवारांनी थेट डीव्हायएसपी गणेश इंगळे यांच्याशी संपर्क साधला.

गणेश इंगळे यांच्याशी बोलताना त्यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. गणेश इंगळे यांना अजित पवार म्हणाले की, बैठक घेऊन पहा, नाही तर मग जो आडवा येईल, त्याला सरळ उचला मग तो अजित पवार का असेना, असे आदेश अजित पवारांनी दिले आहे.

काटेवाडीमध्ये शनिवारी त्यांनी एक तास राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमासाठी वेळ दिला होता. अनेक नागरिकांनी यावेळी वेगवेगळ्या तक्रारी दिल्या. एकाने तर थेट वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगत ते दोन टक्के कमिशन घेत असल्याचे सांगितले. यावर अजित पवारही हैराण झाले.

या प्रकरणी अजित पवार जाहीरपणे काही बोलले नसले, तरी त्यांच्यापर्यंत जो संदेश जायचा होता तो संदेश पोहचला आहे, अशी चर्चा तिथल्या ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. आज स्वत: अजित पवारांनी तक्रारी जाणून घेण्यासाठी वेळ दिल्यामुळे ग्रामस्थही समाधानी दिसून आले.

महत्वाच्या बातम्या-
“महागाईचा भोंगा वाजला, ५० रूपयांनी गॅस वाढला, अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?”
“एवढं नक्की सांगतो, पुढच्यावेळी आढळराव पाटील संसदेत असतील”; राऊतांनी कोल्हेंचे टेंशन वाढवले
पुण्यात मनसेची महाआरती, वसंत मोरेंची नाराजी दूर; शहराध्यक्षांचाही पोलिसांना इशारा