Share

हिंदू मंदीर, सप्ताह, काकड आरती यांच्यावर कारवाई भोंगे उतरवून दाखवाच..; राणेंचे ठाकरे सरकारला चॅलेंज

narayan rane ani thackeray

राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर वातावरण तापलेले आहे. अशात १ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सभा घेतली होती. त्यावरुनही त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत सांगितले. तसेच उत्तर प्रदेशचे भोंगे उतरता, तर महाराष्ट्राचे पण उतरवा, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. (narayan rane challenge to thackeray government)

राज ठाकरेंच्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठे वक्तव्य केले होते. आपल्याकडे शिर्डीच्या साईबाबा मदिंरात ५ वाजता काकड आरती सुरु होते. यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे.

हिंदुंच्या मदिरांवरील भोंगे उतरवणारे अजित पवार हे पहिले हिंदु असतील. हे आमचं दुर्देव आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. अजित पवारांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या भोंग्याबाबत जे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे.

https://twitter.com/MeNarayanRane/status/1521415988054720512?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521415988054720512%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fits-our-unfortune-to-be-first-hindu-to-take-such-action-narayan-rane-criticism-of-ajit-pawar-aau85

उपमुख्यमंत्री अजित पवार जे म्हणाले आहेत, की शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांच्यावर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

दरम्यान, अजित पवार म्हणाले होते की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबाबत माहिती देताय की, त्यांनी भोंगे बंद केले. पण त्यांनी फक्त मशिदींवरील भोंगे बंद केले नाही. तर मंदिरावरील भोंगेही बंद केले आहे. आपल्याकडे शिर्डीच्या साईबाबा मंदिरात काकड आरती होते ती पहाटे ५ वाजता होते, त्यावर कोणी का बोलत नाही.

तसेच आपल्याकडे जागरण गोंधळ कधी असतो, रात्रीच ना? गावागावांमध्ये सप्ताह कधी असतो. रात्रीच. जर यामध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत नसेल तर पोलिस यामध्ये हस्तक्षेप करत नाही. याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतोच ना? मग आता कशासाठी वातावरण खराब करताय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉ ने मुंबईत खरेदी केले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे अपार्टमेंट, वाचा असं काय खास आहे त्यात?
मोठी बातमी! राज ठाकरे जाणार औरंगाबादमध्ये, स्वत:ला करुन घेणार अटक
बिअरचा कॅन 52 रुपयांना आणि रमची बाटली 350 रुपयांना; गुजरातमध्ये दारूचे दर इतके कमी का?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now