Share

VIDEO: आजीने सामी सामी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; लोक म्हणाले, मायकल जॅक्सन अंगात आला

अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पामधील गाणी असोत किंवा डायलॉग हे सर्व सोशल मीडियावर हिट ठरले आहेत. लोकांनी त्याच्याशी संबंधित लाखो रील बनवल्या. विशेष म्हणजे सामी सामी आणि श्रीवल्ली या गाण्याला लोकांनी खुप प्रतिसाद दिला. या गाण्यावरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (old women dance on sami sami)

अशात सामी-सामी गाण्याचा हुक स्टेप करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यावर तरुण-तरुणी नाही तर एक आजी आपला डान्स दाखवत आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ६० पेक्षा जास्त वय असलेली एक आजी सामी सामी गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहे. मायकल जॅक्सनचा आत्मा आजीच्या अंगात आला. त्यामुळे आजी असा डान्स करत आहे, असेही अनेकांनी म्हटले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की आजी सामी सामी हे गाणे ऐकून स्वतःला थांबवू शकत नाही. गाणे ऐकल्यानंतर ती असा जबरदस्त डान्स करण्यास सुरुवात करते, की सगळेच हैराण होऊन जातात. सहसा पन्नाशीच्या वय गेलं तर डान्स करणं अवघड जातं. पण आजीने असा कुठलाही विचार केलेला दिसत नाही.

सहसा या वयातील लोक नीट चालूही शकत नाहीत, त्याच वयात आजींनी सामी सामी गाण्यावर तुफान डान्स केला. आजी सामी सामी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसून आल्या. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आजींचे कौतूक केले आहे. तसेच अनेकांना तर शॉकही बसला आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर ३००० हून अधिक लाईक्स आहेत. व्हिडीओसोबत लिहिले आहे, की तुम्हाला असे कोणाचे भविष्य दिसते? त्यानंतर कमेंटमध्ये लोकांनी त्यांच्या मित्रांना टॅग केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉ ने मुंबईत खरेदी केले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे अपार्टमेंट, वाचा असं काय खास आहे त्यात?
मोठी बातमी! राज ठाकरे जाणार औरंगाबादमध्ये, स्वत:ला करुन घेणार अटक
बिअरचा कॅन 52 रुपयांना आणि रमची बाटली 350 रुपयांना; गुजरातमध्ये दारूचे दर इतके कमी का?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now