Share

लाठीचार्ज होताच पळणारे, म्हणे आम्ही बाबरी पाडायला गेलो होतो; फडणवीसांचा ‘तो’ फोटो व्हायरल

राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्यावरुन राजकारण तापलेले आहे. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. अशात १ मेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली होती. यावेळी ते शिवसेनेवर कडाडून टीका करताना दिसून आले होते. (devendra fadanvis babari mosque photo viral)

भोंगे काढायला लावले तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेनेही देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या फडणवीसांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

आमदार अंबादास दानवे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत देवेंद्र फडणवीस दिसत आहे. या फोटोत पोलिसांचा लाठीचार्ज होत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस पळून जात असल्याचे समोर आले आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

लाठीचार्ज झाला की पळून जाणारे, म्हणे आम्ही बाबरी पाडायला गेलो होतो, असे म्हणत अंबादास दानवे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता या फोटोला भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण सध्या हा फोटो सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

https://www.facebook.com/iambadasdanve/posts/545606856923372

दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या सोमय्या मैदानावर एक सभा घेतली होती. यावेळी ते शिवसेनेवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी बाबरी पाडणाऱ्या भाजप नेत्यांची यादी सभेत वाचून दाखवली. तसेच शिवसेनेचा एकही नेता बाबरी पाडताना तिथे नव्हता, असा आरोप फडणवीसांनी केला होता.

तसेच तुम्ही विचारता बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता? मी अभिमानाने सांगतो, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी मी त्याच ठिकाणी होतो. एवढंच नाही, राममंदिराच्या कारसेवेसाठी १८ दिवस जेलमध्ये होतो. लाठ्या-काठ्या खाण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
आता काही खरं नाही! ठाकरेंना नडने पडले महागात; राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा..
..तर त्याच मैदानावर सभा घेणार, त्यापेक्षा जास्त गर्दी जमवणार, अन् त्याच भाषेत राज ठाकरेंना उत्तर देणार
”जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला येतील ते परत जाणार नाहीत”

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now