Share

ब्रेकिंग! शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी, अटक होण्याची शक्यता

raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे आणि भोंग्याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या ते केंद्रस्थानी आहेत. अशातच आता आणखी एक मोठी समोर आली आहे. सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.

हे अटक वॉरंट एका जुन्या प्रकरणात जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ६ एप्रलि रोजी हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं पण अदयाप राज ठाकरेंवर करवाई का झाली नाही? असा सवाल करत पोलिसांना कोर्टाने झापलं आहे अशी माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपुर्वी राज ठाकरेंविरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं.

२००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. यानंतर राज ठाकरे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत.

जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. दरम्यान, राज ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाला त्यांनी ४ मे चा अल्टीमेटम दिला आहे. राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी राज ठाकरेंवर कठोर कारवाई करण्यात यावी असे विरोधी पक्षातील नेते म्हणत आहेत. त्यातच आता शिराळा कोर्टात राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. अनेक मुस्लिम संघटनांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचेही आवाहन केलं आहे.

त्यामध्ये इम्तिआज जलील यांचाही समावेश आहे. तुम्ही राज ठाकरेंना शिरखुरमा खाण्यासाठी बोलवणार का? असा प्रश्न पत्रकारांनी इम्तियाज जलील यांना विचारला होता. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. राज ठाकरे आता त्या लायकीचे राहिलेले नसून त्यांना आता दुरूनच ईद मुबारक, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
आता काही खरं नाही! ठाकरेंना नडने पडले महागात; राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा..
..तर त्याच मैदानावर सभा घेणार, त्यापेक्षा जास्त गर्दी जमवणार, अन् त्याच भाषेत राज ठाकरेंना उत्तर देणार
मुंबईत कलम १४४ लागू; पोलिसांचे मनसे, हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ मुंबई सोडण्याचे आदेश
‘मशिदींवरील भोंग्यांचा विषय राज ठाकरे तापवत असले तरी, भोंग्यामागचा खरा ‘ढोंग्या’ नागपूरचा’

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now