आज मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण आहे. मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्त अनेक बड्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद म्हणजे दयाभाव आणि दातृत्व सांगणारा सण आहे.
हा सण सगळ्यांच्या आयुष्यात आनंद सुख, समाधान घेऊन येवो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात २९ व्या दिवशी चंद्रग्रहण झालं नाही, त्यामुळे मुस्लिम बांधवांना ३० व्या दिवशी रोजे पुर्ण करावे लागणार आहे.
त्यानंतर ३ मे रोजी म्हणजे मंगळवारी रमजान ईद साजरी करावी लागणार आहे. रमजान आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल म्हणाले की, रमजानचा पवित्र महिना उपवास, प्रार्थना, दानधर्म, तसेच परोपकाराचे महत्व अधोरेखित करतो.
ईद उल फित्र सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना, विशेषत मुस्लिम बंधु-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व समृद्धी घेऊन येवो, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, रमजान महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो.
ईद मंगळवारी असेल रमजानचा महिना ३० दिवसांचा असेल आणि जर ईद सोमवारी असेल तर रमजानचा महिना २९ दिवसांचा असेल. अरब देशांमध्येही रमजानचा महिना ३० दिवसांचा आहे. इस्लाममध्ये अशी मान्यता आहे की रमजानमध्ये दयेचे दरवाजे उघडले जातात. या महिन्यात केल्या जाणाऱ्या नमाजचे पुण्य अनेक पटींनी जास्त असते अशी मान्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मशिदींवरील भोंग्यांचा विषय राज ठाकरे तापवत असले तरी, भोंग्यामागचा खरा ‘ढोंग्या’ नागपूरचा’
माझ्या मनात आजही मोदींबद्दल प्रेम, मी त्यांचा आदर करतो; उद्धव ठाकरेंचे मोदीप्रेम अचानक का उफाळले?
वैज्ञानिकाच्या घरावर छापा, लाखोंची रोकड आणि सोन्याचे दागिने पाहून अधिकारीही झाले हैराण
राजेंद्र पवारांचा कृषीरत्न पुरस्कार स्विकारण्यास नकार; राज्यपालांवर केले ‘हे’ गंभीर आरोप