मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेतली. त्यानंतर राजकारण तापलेले आहे. या सभेची गेल्या 10 दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर सभेला परवानगी मिळाली आणि सभा पार पडली. या सभेनंतर अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टिका केली आहे.
या सभेकडे अवघ्या राज्याच लक्ष लागलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राजकारण तापलं आहे. अनेक नेत्यांनी राज ठाकरेंचा हा दावा खोडून काढला आहे. पण आता स्वता लोकमान्य टिळकांचे पणतू कुणाल टिळक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी टिळकांवर सुरू असलेले राजकारण थांबवण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, सोशल मिडीयावर जी काही टिळकांची बदनामी सुरू आहे ती कृपया करून थांबवा. टिळकांना राजकारणात ओढलं जातंय. कोणत्याही पुराव्याशिवाय लोक काहीही बोलत आहेत.
शिवरायांची समाधी बांधल्याचा टिळक कुटुंबीयांचा दावा नाही, असं ते म्हणाले. टिळकांनी नाही तर फुलेंनी शिवरायांची समाधी बांधली असा काही इतिहासकारांचा दावा होता आणि राज ठाकरेंच्या दाव्यामुळे राजकारण तापलं होतं. पुढे कुणाल टिळक म्हणाले की, काहींकडून ब्राम्हणद्वेष पुढं आणण्याचं काम होत आहे.
टिळकांनी जो काही फंड जमा केला होता तो डेक्कन बँकेत जमा केले होते. त्याचे पुरावे केसरीमध्ये १८९९ च्या वर्तमानपत्रात आहेत. टिळकांनी याचे पुरावे केसरीमध्ये छापले आहे. त्यानंतर डेक्कन बॅंक दिवाळखोरीत गेली. समाधीसाठी टिळकांनी २० हजारांचा निधी जमा केला होता, असंही ते म्हणाले.
पुढे त्यांनी महाराष्ट्राला आवाहन केलं की, सोशल मिडीयावर ब्राम्हण समाजाचा अपमान होत आहे. माझी एवढीच विनंती आहे की आपण पुर्ण अभ्यास करून मतं मांडली पाहिजेत. मला सकाळपासून ब्राम्हण लोकांचे फोन येत आहेत की आपण यावर काहीतरी केलं पाहिजे. ब्राम्हण समाजाचा अपमान नाही व्हायला पाहिजे त्यामुळं हे सगळं थांबवावं असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: पोलिस कर्मचाऱ्याने असा रॅप म्हणला की, लोकं झाले हैराण; म्हणाले, हा तर एमिनेमचा बाप निघाला
इरफान खानने पत्नी-मुलासांठी सोडली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती, ‘या’ गोष्टींमधूनही करत असे मोठी कमाई
करोडोंची मालकीण असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवटचा काळ गेला गरिबीत, मुलानेही वाऱ्यावर सोडले
मोदींसोबतच्या संबंधावर पहिल्यांदाच मोकळेपणाने मुख्यमंत्री ठाकरेंचं वक्तव्य; वाचा काय म्हणाले…