Share

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर पडली ईडीची धाड, तब्बल ७.२७ कोटींची मालमत्ता केली जप्त

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांचे वैयक्तिक फोटो व्हायरल झाल्यापासून दोघांमधील नातं चर्चेचा विषय बनले होते. त्याचवेळी अनेक दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या जॅकलिनच्या या प्रकरणातील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. (jackline fernandise ed raid)

आता या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. आता ईडीने जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. खंडणीचा वापर करून सुकेशने जॅकलिनला ५.७१ कोटी रुपये गिफ्ट दिल्याचा अंदाज ईडीने व्यक्त केला आहे. त्यामुळे ईडीने ही संपत्ती जप्त केली आहे.

तसेच जॅकलिनच्या कुटुंबीयांना १,७३,००० यूएस डॉलर आणि सुमारे २७,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा फंडही देण्यात आला आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वीच जॅकलिनची चौकशी केली आहे. जॅकलीन आणि सुरेशच्या अफेअरच्या बातम्या जॅकलिनने फेटाळून लावल्या होत्या, तर सुकेशने त्यांच्या अफेअरचा स्वीकार केला होता.

जॅकलीनसोबतचे त्याचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक झाल्यानंतर सुकेश चंद्रशेखर यांनी तुरुंगातून पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. सुकेशने लिहिले की, हे खूप दुःखद आणि अस्वस्थ करणारं आहे. खाजगी फोटो कसे पसरवले जातात. हे एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टींचे आणि गोपनीयतेचे उल्लंघन आहे.

सुकेशने फोटोंचे चुकीचे चित्रण न करण्याचे आवाहन केले आणि जॅकलिनचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. जॅकलिन आणि तिच्या कुटुंबासाठी मी सर्व काही केले होते, असेही सुकेशने आपल्या पत्रात म्हटले होते.

हे संपूर्ण प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. सुकेशवर २०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच त्यातील काही रक्कम त्याने जॅकलिनवर खर्च केली आहे. सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याने चौकशीदरम्यान जॅकलिनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे पोलिसांना सांगितली होती. त्यात नोरा फतेहीच्या नावाचाही समावेश होता. याप्रकरणी ईडीने नोराचीही चौकशी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला
ज्योतिष अभ्यासकांची देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘२०२३ नंतर सत्तेच्या जवळ…’
ऍक्शन आणि रोमान्सने भरलेला हिरोपंती २ पाहायला जावं की नाही? वाचा हिरोपंती २ चा रिव्ह्यु

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now