सध्या राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एक खळबळजनक बातमी हाती येत आहे. पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी भाजपच्या महिला नेत्याला गुरुवारी कर्नाटक सीआयडीने पुण्यातून अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवारी रात्री पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांना पुण्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणावर अद्याप भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये. ते जाणून घेऊया सविस्तर नेमकं प्रकरण काय? का झाली भाजपच्या महिला नेत्याला अटक?
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या हागारगी या ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक काही शिक्षिका तसेच कनिष्ठ अभियंता मंजुनाथ मेळकुंडी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात गेले होते.
मात्र त्याआधी आरोपींनी अटपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींचा शोध घेत होते. अखेर पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी त्यांना कर्नाटक सीआयडीने पुण्यातून अटक केली आहे.
दरम्यान, सीआयडीच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, पीएसआय पदासाठी प्रत्येक उमेदवाराकडून ६० लाख रुपयांची लाच घेण्याचा करार झाला होता. तसेच पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी या भरती प्रकरणाती घोटाळ्यात गुन्हे अन्वेशन विभागाने 5 जणांना अटक केली आहे. प्रमुख आरोपी दिव्या हागारगीला गुरुवारी रात्री पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अटक करण्यात आलेली दिव्या ही 18 वी आरोपी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शरीर थकलं, आवाज थरथरत होता; भावूक होतं रतन टाटांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर
लता मंगेशकरांच्या ‘त्या’ गाण्याबाबत दिली चुकीची माहिती, तारक मेहताच्या टीमने मागितली माफी
‘Indian Idol 12’ फेम सायली कांबळेचे पतीसोबतचे रोमॅंटिक फोटो झाले व्हायरल, एकदा बघाच..
इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यास मोदी सरकारने घातली बंदी; धक्कादायक कारण आले समोर