राज्यातच नाही, तर देशभरात मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध दर्शवल्यानंतर देशातील विविध संघटनांनीही या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. भाजपही याला पाठिंबा देताना दिसून येत आहे. (narendra modi azaan video)
आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभा संघटनेने लाऊडस्पीकरवर लावण्यात येणाऱ्या अजानवर पुर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. पण अद्याप याप्रकरणी सुनावणी झालेली नाही. याच वादादरम्यान पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोदी अजान सुरु असल्यामुळे आपले भाषण थांबवताना दिसून येतात.
मोदींचा हा व्हिडिओ २०१६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील आहे. २७ मार्च २०१६ या दिवशी पंतप्रधान मोदी मिदनापूर जिल्ह्यात पोहोचले. तेथे ते खरगपूर येथील बीएनआर मैदानावर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यादरम्यान पंतप्रधान मोदी अचानक भाषण देण्याचे थांबले. ते काही मिनिटे गप्प होते.
Prime Minister #narendramodi pause his speech for more than 3 minutes during the election rally in Kharagpur when #azan was heard from a nearby mosque .
PM Modi also brought down his mic and asked the crowd to be quite during the #azaan pic.twitter.com/T10azTcBHd— Pranab Raj Kumar (@iAmPranabRaj) May 30, 2019
त्यानंतर ते म्हणाले, मला माफ करा. अजान चालू होती. आमच्यामुळे कोणाच्याही पूजा-अर्चा करण्यात अडचण येऊ नये. म्हणून मी थोडा वेळ थांबलो होतो. मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून पंतप्रधान मोदींची अजानबाबतची ही वृत्ती पाहून लोक म्हणू लागले आहेत की, एकेकाळी देशाच्या पंतप्रधानांनी यासाठी भाषण थांबवले होते आणि आता त्यांचाच पक्ष त्याविरोधात जोरात बोलत आहे.
अजानच्या वेळी पंतप्रधानांनी भाषण थांबवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा असे केले आहे. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी असाच हावभाव दाखवला होता. ते २९ नोव्हेंबर २०१७ रोजी नवसारी येथे भाजपच्या सभेला संबोधित करत होते. त्यानंतर अजानचा आवाज आला आणि मोदी बोलायचे थांबले.
तसेच ३ मार्च २०१८ रोजी त्यांनी भाजप मुख्यालयातील भाषणही थांबवले होते. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी भाजपच्या मुख्यालयात पोहोचले होते. भाषण सुरू झाल्यानंतर एक मिनिटाने जवळच्या मशिदीत अजान सुरू झाले. यावर पीएम मोदी म्हणाले होते, दोन मिनिटे थांबा अजान संपल्यावर बोलू.
महत्वाच्या बातम्या-
भारतातल्या मुस्लिमांच्या सुरक्षिततेसाठी….; प्रसिद्ध फुटबॉलपटूच्या वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता
“पोलिसांनी परवानगी दिली, तरी राज ठाकरेंची सभा उधळून लावू”; भीम आर्मीचा मनसेला इशारा
पाच वर्षात पेट्रोल-डिझेलवर एक रूपयाचाही टॅक्स ठेवणार नाही, पुर्ण टॅक्स फ्री करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा