शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे हे सायकलवरून पडल्याची माहिती मिळाली आहे. सायकलवरून पडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्या खुब्याला मार लागला आहे. सायकलवरून पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झाले असे की, शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे हे बुधवारी सायंकाळी गणपती पेठेतून सायकलवरून गणेश मंदिराकडे निघाले होते.
वळणावर अचानक त्यांना चक्कर आली आणि त्यांचा तोल गेला आणि ते सायकलवरून पडले. त्यानंतर त्यांच्या खुब्याला मार लागला. त्यानंतर तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार करण्यासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांचे वय ८३ वर्षे आहे. संभाजी भिडेंच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड गर्दी केली. संभाजी भिडेंचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उपचारासाठी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, संभाजी भिडे नित्यनियमाने सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असतात. आजही दर्शनासाठी ते जात होते. त्यानंतर गणपती पेठेत त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांनी कालच एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातून अनेकांना विषबाधा होते.
या भूतबाधेवर, विषबाधेवर उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा आमि तिसरी गांधी बाधा. मिरजच्या शिवतीर्थ परिसरात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अनावरण सोहळ्यात त्यांना बोलावण्यात आलं होतं. ते पुढे म्हणाले की, म्लेंच बाधा, आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा.
या तिन्ही बाधांवर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची उपासना आपण केली पाहिजे. त्याचबरोबर हिंदुस्थान चोरांच्या ताब्यात आहे. त्यांना नेस्तनाबूत करा. देशावर भगव्याचे राज्य स्थापित करा. छत्रपतींची तिच अपेक्षा आहे. ते पुर्ण करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. देशाला ताकद देण्यासाठी हिंदुस्थानच्या सर्व समाजातील १२३ कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे. त्यांचा रक्तगट शिवाजी-संभाजी केला पाहिजे, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
मातोश्रीवर बाळासाहेब आनंद दिघेंची गुरूपोर्णिमा! ‘धर्मवीर’चे गाणे तुफान हिट; २० तासांत २० लाख व्ह्यूज
किळसवाणे! ३० वर्षांपासून रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवला जातोय समोसा, अधिकाऱ्यांनाही बसला धक्का
मुलाच्या मृत्युनंतर ‘हे’ मोलाचे काम करत आहे सिद्धार्थ शुक्लाची आई, पाहून नेटकरीही झाले भावूक
‘या’ पाच कारणांमुळे बिघडला प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा खेळ, वाचा सविस्तर..